शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:03 PM

सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी होणार ,पोलीस व आरोग्य पथक सहभागी असणार

ठळक मुद्देयंदा कोरोना संकटामुळे पंढरपूर पायी पालखी सोहळा रद्द

देहूगाव : आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला नेण्यात येणार आहे, यामध्ये सहभागी होणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी केली जाणार असून दहा जणांनाच परवानगी मिळणार आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने यंदा वारकरी संप्रदायाने आषाढी पायी वारी सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी विविध संताच्या पालख्या पंढरीस येतात. संतांच्या पादुका घेऊन ३० जूनला दशमीच्या दिवशी दुपारी वाखरीत येतील तेथून सर्व पालख्या पंढरपूमध्ये प्रवेश करणार आहेत.श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका ३० जुनला पहाटे सहाच्या सुमारास दहा वारकºयांच्यासह पंढरपूकडे रवाना होणार आहेत. यासाठी शासनाने बसची व्यवस्था केली आहे. बसला फुलांची सजावट हेणार असून कापूर ओढ्या जवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल.यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत ही आरती झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाईल. रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अभंग तिसºया अभंग आरतीसाठी काही वेळ थांबेल. तेथून हा सोहळा वाखरीयेथे दुपारी बाराला पोहोचेल.

वाखरीत संत भेट, चौथी अभंग आरती होईल. संस्थानच्या वतीने नैवद्यप्रसाद दाखविण्यात येईल.  त्यानंतर हा सोहळा पंढरपूरात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. थोरल्या पादुका येथे पाचवी अभंग आरती होईल. येथून पाच वाजण्याच्या सुमारास नगरप्रदक्षिणा, त्यानंतर पादुका मुक्कामस्थळी नेण्यात येतील. एकादशी १ जुलैला सकाळी ७ ला नगर प्रदक्षिणा, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पादुकांना परंपरेप्रमाणे चंद्रभागा चंद्रभागा स्नान घालण्यात येईल व पादुका तेथील पुंडलिक महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेण्यात येतील. पुंडलिक महाराजांचे दर्शन झाल्यानंतर पादुका वैष्णव देवता पांडूरंगाच्या द्वारदर्शनासाठी महाद्वारात नेण्यात येणार आहे. तेथे सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी हा अभंग होईल. यानंतर पादुका श्री संत तुकाराम महाराज मठामध्ये पाच दिवसांसाठी विसावतील. पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूरा येथे काल्याचे किर्तन व काल्याच्या महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल. यानंतर पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येईल व दुपारी तीनच्या सुमारास पादुका दर्शन सोहळा पुन्हा बसने परतीच्या प्रवासाला निघेल.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाAshadhi Ekadashiआषाढी एकादशी