शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:06 IST

Sant tukaram maharaj palkhi 2025 schedule: श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.  

देहूगाव (जि. पुणे) : पंढरीचा महिमा। देतां आणिक उपमा।। ऐसा ठाव नाही कोठे। देव उभा उभी भेटे।। आहेती सकळ। तीर्थें काळे देती फळ। तुका म्हणे पेठ। भूमिवरी हे वैकुंठ।। असा पंढरीचा महिमा वर्णन करणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूमधील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.  

प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली. ते म्हणाले की, यंदाचा ३४० वा पालखी सोहळा आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्यावतीने पूर्ण तयारी झाली आहे. चांदीच्या रथाला उजाळा देण्यात आला आहे. त्याला आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

मंदिरात ४२ व मंदिराच्या बाहेरील भागात आठ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मंदिराच्या कळसाला फुलांची सजावट करण्यात आली आहे. भजनी मंडपात सकाळी प्रस्थानापूर्वी देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी अडीचला महाराजांच्या पादुकांचे पूजन होऊन पालखीचे प्रस्थान ठेवले जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक.

यंदा संस्थानने तीन बैलजोड्या खरेदी केल्या आहेत. पालखीपुढे चालणारा मानाचा पेठ बाभुळगावकरांचा अश्व  मंगळवारी चिखली येथे मुक्कामी असणार असून, बुधवारी प्रस्थानस्थळी उपस्थित होईल. अकलूजच्या मोहिते-पाटील यांचा अश्व बुधवारी सकाळी देहू येथे दाखल होईल.

कसा आहे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मार्ग १८ जून- देहूतून प्रस्थान१९ जून- आकुर्डी२० जून- नाना पेठ, पुणे२१ जून- निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे२२ जून- लोनी काळभोर२३ जून- यवत२४ जून- वरवंड२५ जून- उंडवडी गवळ्याची२६ जून- बारामती२७ जून- सणसर२८ जून- निमगाव केतकी,२९ जून- इंदापूर३० जून- सराटी१ जुलै- अकलूज२ जुलै बोरगाव श्रीपूर३ जुलै- पिराची करौली४ जुलै- वाखरी५ जुलै- पंढरपूर

पालखी सोहळ्यात रंगणार तीन उभे, तीन गोल रिंगण- बेलवडी येथे पहिले गोल रिंगण- काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण- इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण - सराटी येथे पादुकांना नीरास्नान - अकलूज येथे तिसरे गोल रिंगण - माळीनगर येथे पहिले उभे रिंगण तोंडले बोंडले येथे धावा- बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण - वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण- यंदा तिथीचा क्षय झाल्याने आंथुर्णे येथील पालखीचा मुक्काम रह- यंदा पालखी रथाच्या पुढे २७ व मागे ३७० दिंड्या सहभागी होणार

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाMaharashtraमहाराष्ट्रashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५sant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant tukaramसंत तुकाराम