शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

पुण्यनगरीला ज्ञानोबा - तुकोबांच्या दर्शनाची आस : आज पालखी पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 1:57 PM

महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचे श्रध्दास्थान असणा-या संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि  संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन आज सायंकाळी पुण्यात होत आहे.

ठळक मुद्देशनिवार रविवार पालख्या पुण्यात : पुणेकरांचा उत्साह शिगेला शहरावर पसरणार भक्ती रंग : वारकऱ्यांसह पुणेकर जयघोषात दंग 

पुणे : महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचे श्रध्दास्थान असणा-या संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि  संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन आज सायंकाळी पुण्यात होत आहे. पालख्यांंबरोबर हजारोंच्या संख्येने वारकरी शहरात येणार असून त्यांच्या स्वागताकरिता अवघी पुण्यनगरी सज्ज झाली असून ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्यांच्या दर्शनाची ओढ नागरिकांना लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु होती. ती आता पूर्ण झाली आहे. 

       विठुरायाच्या दर्शनाकरिता मैलोन मैल चा प्रवास करुन पंढरीकडे निघालेल्या वारकरी भक्त काही काळ विश्रांतीकरिता पुण्यात थांबणार आहेत. एकदा वारकरी बांधवांनी पुण्यात विश्रांती घेतली की त्यानंतर त्यांच्या सेवेत पुणेकर आनंदाने सहभागी होतात. याप्रसंगी कुणी त्यांचे पाय चेपून देतो, कुणी हातापायांना मालिश करतो, जमेल तितकी सेवा करुन विठ्ठ्ल दर्शनाचा लाभ त्या सेवेतून घ्यायचा. असा त्या सेवेमागील उद्देश. त्यांच्या स्वागताकरिता शहरातील विविध संघटना, सेवा भावी संघ, गणेश मंडळे, प्रतिष्ठान यांनी मोठ्या भक्तिभावाने तयारी केली आहे. 

       बाजारपेठांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहवयास मिळत आहे.रस्त्याच्या दुतर्फा खरेदीसाठी विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. फेरीवाल्यांची जागा मिळविण्यासाठी धडपड सुरु असून याबरोबरच प्रसादाचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. भाविकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी कुठलीही अडचण होवू नये, रांगेत अनुउचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे भाविकांचा गोंधळ होवू नये यासाठी रांगेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. पावसाची खबरदारी घेवून निवा-यासाठी मोठमोठे मंडप टाकण्यात आल्याने भाविकांसाठी सुरक्षित निवारा तयार झाला आहे. पत्ता चुकणा-यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. विशेषत: या सर्व मदत कार्यात विविध महाविद्यालये, त्यातील एनएसएस, एनसीसी, याबरोबरच स्थांिनक मंडळाचे कार्यकर्ते पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडावा यासाठी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले आहेत.  

  • संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर संत तुकारामांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठ्ल मंदिरात विसावा घेणार आहे.  
  • शहरात आता सर्वत्र भक्तिमय वातावरण असून ज्या ठिकाणी दोन्ही पालख्या मुक्कामाकरिता थांबणार आहे त्या जागी सुशोभिकरण करण्यात आले आहे. 
  • शहरातील ज्येष्ठ नागरिक यांची विरंगुळा केंद्र, गणपती मंडळाची जागा, अभ्यासिका,अशा अनेक ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेच्यावतीने देखील मोठ्या प्रमाणावर वारकरी बांधवांच्या निवा-याची काळजी घेण्यात आलेली आहे. 
  • पालखीच्या दुस-या दोन्ही पालख्यांच्या दर्शनाकरिता भाविकांची प्रचंड गर्दी होते. याची काळजी घेवून पोलिस प्रशासनाच्यावतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कँमेराव्दारे संशयितावर वॉच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली. 
  • सोमवारी सकाळी  संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सासवडकडे होणार आहे. संत तुकोबांची पालखीचे प्रस्थान सोमवारी सकाळी हडपसरच्या दिशेने होईल. 
टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा