आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पायी वारीचे स्वरूप बदलून आषाढ शुद्ध दशमीला संतांच्या पादुका हेलिकॉप्टर अथवा बसद्वारे थेट पंढरीत पोचविण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यानुसार माऊलींच्या चलपादुका येत्या मंगळवारी (दि.३०) आळंदीतून पंढरपूरला अवघ्या वीस व्यक्तींसोबत शिवनेरी बसद्वारे नेण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला आज प्राप्त झाले आहे. कडक पोलीस बंदोबस्तात जाणाऱ्या वारीची उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
जय जय रामकृष्ण हरी, माऊलींची पालखी आषाढी वारीसाठी वीस जणांसह शिवनेरी बसने पंढरपूरला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 16:00 IST
कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे खबरदारी म्हणून यंदाचा आषाढी पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
जय जय रामकृष्ण हरी, माऊलींची पालखी आषाढी वारीसाठी वीस जणांसह शिवनेरी बसने पंढरपूरला जाणार
ठळक मुद्देराज्य सरकारकडून याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानला मिळाले पत्र पादुका पंढरीला नेण्यासाठी शासनाकडून शिवनेरी बस उपलब्ध करून दिली जाणारपादुकासोबत येणाऱ्या व्यक्तींची कोरोना टेस्ट केली जाणार आषाढी वारीत संतांच्या पादुकांसोबत उपजिल्हाधिकारी अथवा तहसिलदार असणार