शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत संपन्न करावा : जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 19:21 IST

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला (दि. १३) होणार

ठळक मुद्दे निदेर्शांचे पालन करणे अनिवार्यशासन नियमावली अधीन राहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा संपन्न केला जाणार प्रस्थान सोहळ्याला मंदिरात प्रवेश दिला जाणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार

आळंदी (शेलपिंपळगाव) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळयास शनिवारी  (दि.१३) मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत व उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.               कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर यंदा संत ज्ञानेश्वर माउलींचा पायीवारी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत. मात्र राज्य शासनाच्या सूचनेनुसार आळंदीतील माउलींचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान आषाढी एकादशीच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला अर्थातच शनिवारी (दि. १३) होत आहे.                यापार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळा संपन्न करण्यासाठी किमान पन्नास जणांच्या उपस्थितीतीची परवानगी देवस्थानने प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे मागितली होती. त्यानुसार आज (दि.११) प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्याची तयारी करण्याचा देवस्थानचा मार्ग मोकळा झाला आहे.        दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.

............................

" शासनाने दिलेल्या नियमावलीत अधीन राहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा संपन्न केला जाणार आहे.  प्रस्थान सोहळ्याला मंदिरात प्रवेश दिला जाणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. चालू वर्षी कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन वारकऱ्यांनीही देवस्थानला सहकार्य करावे.''       - अ‍ॅड. विकास ढगे - पाटील, प्रमुख विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी.

टॅग्स :AlandiआळंदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामAshadhi Ekadashiआषाढी एकादशीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीState Governmentराज्य सरकार