रँकिंगमध्ये संकल्प गौर देशात प्रथम
By Admin | Updated: July 2, 2015 01:02 IST2015-07-02T01:02:47+5:302015-07-02T01:02:47+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) जेईई मेन्स व बारावीच्या परीक्षेचा एकत्रित अधिकृत निकाल (रँकिंग) जाहीर करण्यात आला असून त्यात पुण्याच्या संकल्प गौर

रँकिंगमध्ये संकल्प गौर देशात प्रथम
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) जेईई मेन्स व बारावीच्या परीक्षेचा एकत्रित अधिकृत निकाल (रँकिंग) जाहीर करण्यात आला असून त्यात पुण्याच्या संकल्प गौर याने देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. देशभरातील १३ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. एनआयआयटी आणि आयआयआयटी या संस्थांमधील प्रवेशासाठी हे रँकिंग महत्त्वाचे असते.
संकल्पने जेईई मेन्स परीक्षेत ३६० पैकी ३४५ गुण मिळवून राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला होता. (प्रतिनिधी)