शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विमानाने संजूबाबा घरी परतला

By admin | Updated: December 25, 2014 02:50 IST

‘पीके’मधील भूमिकेने पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता संजय दत्त अखेर येरवाडा तुरुंगातून १४ दिवसंच्या फर्लो रजेवर खासगी विमानाने बुधवारी

मुंबई : ‘पीके’मधील भूमिकेने पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता संजय दत्त अखेर येरवाडा तुरुंगातून १४ दिवसंच्या फर्लो रजेवर खासगी विमानाने बुधवारी मुंबईत दाखल झाला़ तुरुंगात असतानाही तेथे नियमित व्यायाम व आहार घेऊन कमावलेले अ‍ॅप्स त्याने चाहत्यांना या वेळी आवर्जून पोज देऊन दाखवले़ या रजेमुळे संजूबाबा ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत कुटुंबीयांसोबत करेल़ महत्त्वाचे म्हणजे कारागृहात संजूबाबने एका चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिले असून १८ किलो वजन कमी केले आहे़‘पीके’च्या प्रमोशनसाठी ही सुटी मंजूर झाल्याची चर्चा रंगली होती़ मुंबईत दाखल झाल्यानंतर संजूबाबाला पाहण्यासाठी चाहत्यांनी पवनहंस येथे गर्दी केली होती़ फर्लो रजा हा कैद्यांचा अधिकार असून माझ्यासाठी याकरिता विशेष तरतूद केलेली नाही, असेही या वेळी संजूबाबाने नमूद केले. सुप्रीम कोर्टने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. १८ महिने शिक्षा त्याने पूर्वी भोगली आहे. मे २०१३ पासून उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी तो पुन्हा जेलमध्ये गेला. पण या शिक्षेत संजय दत्तने आतापर्यंत वारंवार सुट्टी घेतली आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर कैद्याला १४ दिवसांची फर्लो रजा दिली जाते. त्यात आणखी १४ दिवस मुदतवाढ मिळू शकते. संजय दत्तने काही दिवसांपूर्वी फर्लो रजेसाठी जेल प्रशासनाकडे अर्ज केला होता. राज्याचे पोलीस महासंचालकांनी ही रजा मंजूर केली आहे. (प्रतिनिधी)