शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

'थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे...', भास्कर जाधवांच्या 'त्या' कृत्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 11:55 IST

Shivsena MP Sanjay Raut on MLA Bhaskar Jadhav: 'लोकांचा आक्रोश समजून घेणं महत्त्वाचं आहे.'

ठळक मुद्दे 'श्रीमंत मुंबईकरांनी महाराष्ट्र उभं करण्यासाठी पुढे यावं'

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असं सांगितलं. यावेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महिलेवर दमदाटी केल्याचा प्रकार घडला, याचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होतोय. या दमदाटीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'भास्कर जाधवांचा व्हिडिओ मी पाहिला नाही, फक्त वृत्तपत्रांमध्ये वाचलं. या प्रकरणावर स्वतः भास्क जाधव स्पष्ट बोलू शकतील. पण, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संयम ठेवणं गरजेचं आहे. लोकांचा आक्रोश वेदना समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार हे करतचं आहेत', असे संजय राऊत म्हणाले.

Chiplun: 'भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही'

श्रीमंत मुंबईकरांनी मदतीसाठी पुढं यावंसंजय राऊत पुढ म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे. कोकणावर सर्वाधिक संकट कोसळलंय, लाखो लोक बेघर झालेत. अनेकांचे जीव गेले आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. महाराष्ट्र सरकारचा त्यांना सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल. तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा आता महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, महाराष्ट्राने ज्याला कोणाला दिलंय, त्या सगळ्यांची जबाबदारी आहे महाराष्ट्राला उभं करायची. जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मुंबईचे अनेक जण आहेत, त्यांनी सुद्धा मदत करायला हवी, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.

काय म्हणाले  भास्कर जाधव ?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमधील व्यापाऱ्यांशी चर्चा करत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली. 'पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचलं, त्यात सर्वकाही वाहून गेलंय. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ  नका हो', अशी विनवणी तिने केली. तसच, सर्व आमदार खासदारांचा दोन महिन्यांच्या पगार कोकणला मदत म्हणून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी भास्कर जाधवांनी 'आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय,' असे म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांसोबत चालणाऱ्या ताफ्याला तिथून पुढे सरकरण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री थोडे पुढे गेल्यानंतर जाधव यांनी, 'तुझा मुलगा कुठंय??? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,' असंही दमदाटी केल्याच्या स्वरात सांगितल्याचं सर्वांनी पाहिलं. याच व्हिडीओवरुन आता विरोधक भास्कर जाधवांवर टीका करताना दिसत आहेत.

टॅग्स :ChiplunचिपळुणSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBhaskar Jadhavभास्कर जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरे