शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:14 IST

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाच प्रश्न विचारले आहेत.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आता दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने होणार आहेत. यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रश्न विचारले आहेत.  'पाकिस्तानशी कोणतेही द्विपक्षीय क्रीडा संबंध राहणार नाहीत परंतु बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तान संघासोबत सामने खेळता येतील', असं सरकारचे म्हणणे आहे.  राऊतांनी पीएम मोदी यांना पत्र लिहून या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. 

'पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू अद्याप थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत सामना खेळणे अत्यंत अमानवीय आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले

"आशिया कपमध्ये पाकिस्तानशी सामना होणे भारतीयांसाठी खूप कठीण आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाच्या मंजुरीशिवाय हे शक्य नव्हते", असे या पत्रात राऊतांनी म्हटले. 

पाकिस्तानसोबत सामने खेळणे हा आपला अपमान - संजय राऊत

"पाकिस्तानसोबत सामने खेळणे हा केवळ सैनिकांचाच नाही तर काश्मीरसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक शहीदांचाही अपमान आहे. हे सामने दुबईमध्ये होत आहेत. जर ते महाराष्ट्रात असते तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने हे होऊ दिले नसते. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा क्रिकेटला प्राधान्य मिळाले आहे. तुमच्या दृष्टीने देशवासीयांच्या भावनांना काहीही किंमत नाही. शिवसेना तुमच्या निर्णयाचा निषेध करते, असे संजय राऊत म्हणाले.

आशिया कप ९ सप्टेंबरपासून होणार आहे. यासाठी भारताने आपला संघही जाहीर केला आहे. यामध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने येऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना १४ सप्टेंबर रोजी होऊ शकतो. हा सामना दुबईमध्ये खेळवला जाईल.

संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले

"देशवासीयांच्या वतीने त्यांना सरकारसमोर भावना मांडायच्या आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, तर पाकिस्तानशी सामना कसा होऊ शकतो? पहलगाम हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला आणि २६ महिलांचे सिंदूर पुसले, तुम्हाला त्या माता-भगिनींचे दुःख समजले आहे का? तुम्ही म्हणालात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहू शकते का?, असा सवाल राऊतांनी केला.

"पाकिस्तानसोबतच्या सामन्यांमध्ये खूप सट्टेबाजी आणि जुगार होतो. भाजपचे लोकही यात सहभागी आहेत. गुजरातचे जय शाह क्रिकेटशी संबंधित बाबी पाहतात. मग या सामन्यांमधून भाजपला मोठा फायदा होतो का?, असा आरोपही संजय राऊतांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर