'चंद्रकांत पाटलांना पहाटेच्या शपथविधीचे झटके येत असतील', संजय राऊतांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 04:54 PM2021-11-23T16:54:40+5:302021-11-23T16:58:42+5:30

'एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे,काहीतरी तोडगा लवकरच निघेल'

Sanjay Raut slams Chandrakant Patil, says 'Chandrakant Patil having shock of morning swearing in' | 'चंद्रकांत पाटलांना पहाटेच्या शपथविधीचे झटके येत असतील', संजय राऊतांचे टीकास्त्र

'चंद्रकांत पाटलांना पहाटेच्या शपथविधीचे झटके येत असतील', संजय राऊतांचे टीकास्त्र

googlenewsNext

मुंबई: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Strike) सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत(Sanjay Raut)  यांनी शरद पवार(Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी माध्यमाशी संवाद साधताना राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर पहाटेच्या शपथविधीवरुन निशाणा साधला.

संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये दोन तास बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्दयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ''चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil)  यांनी आतापर्यंत अनेकवेळा हे सरकार जाईल असं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने हे सरकारला काही फरक पडत नाही. हे सरकार पुढील अनेक वर्षे टिकेल'', असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना झटके येत असतील
विशेष म्हणजे, आजच्या दिवशी दोन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यावरुनही राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली. संजय राऊत म्हणाले, ''पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे होत आहेत. बहूतेक त्याच शपथविधीचे झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत आणि म्हणून ते सारखं बोलत आहेत की, सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा, इतकंच मी त्यांना सांगेल'', असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं ?
एसटीचा विषय हा तुम्हाला गंभीर वाटत असेल तर तो लवकरच सुटेल. शरद पवारांचीएसटी संपाबाबत काही भूमिका आहे त्याबाबत त्यांनी अनिल परब आणि अजित पवारांसोबत चर्चा केली आहे. एसटी संपाबाबत पवार यांच्या बोलण्यातून असं वाटत आहे की काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे

राज्यातील वातावरण कोण आणि का भडकवत आहे, या मागील हेतू सर्वांना माहिती आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करत आहे, हेही आम्हाला माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी सर्वांना सहानुभूती आहे. जे करता येणे शक्य आहे ते सरकार करत आहे. शरद पवारांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, हे मला समजले, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

 

Web Title: Sanjay Raut slams Chandrakant Patil, says 'Chandrakant Patil having shock of morning swearing in'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.