शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

'...तर मला अटक करुन दाखवा'; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 13:27 IST

Sanjay raut slams chandrakant patil: 'सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त झाले आहेत.'

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी(bhagat singh koshyari) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत(sanjay raut) यांनी टीका केली होती, असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. त्यावर आता स्वतः राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'राज्यपालांवर मी टीका केली नाही. भाजपला तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी', असं थेट आव्हान संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांना दिल आहे.  

त्यांनी मानसिक स्वास्थ्य नीट केलं पाहिजेसंजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांवरील टीकेवर स्पष्टीकरण दिले. राज्यपाल आमच्यासाठी 'नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. मी राज्यपालांवर टीका केली नाही. पण,तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा', असं थेट आव्हानच राऊतांनी दिलं. याशिवाय, राऊत यांना चंद्रकांत पाटलांनी कंपाऊंडर म्हणून टोमणा मारला होता. त्यावरही त्यांनी सडकून टीका केली. 'चंद्रकांत पाटलांनी आपल मानसिक स्वास्थ्य नीट केलं पाहिजे. सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त आहेत', असा हल्ला राऊतांनी चढवला.

सरकार पडणार नाहीचंद्रकांत पाटलांनी काल टीका करताना 'राऊत पवारांसाठी काम करतात की शिवसेनेसाठी?' असा प्रश्न केला होता. त्यावर उत्त देताना राऊत म्हणाले की, 'कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते, आज ते देशाचे नेते आहेत. आमचे दोघांशी चांगले संबंध आहेत. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये. सरकार पडणार नाही', असं राऊत म्हणाले.

आमच्याकडे दंड आणि दांडा...यावेळी राऊत यांनी चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर केलेल्या एका टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. 'राऊतांच्या दंडात ताकद आहे का?' असा बोचरा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, 'शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो', असा इशारा त्यांनी दिला.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी