शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:04 IST

Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार की नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे.

Maha Vikas Aghadi MNS News: मुंबईसह होत असलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची वाढत असलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अलीकडेच ठाकरे बंधूंचे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजन झाले. यातच राज ठाकरे यांना काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. परंतु, काँग्रेस नेत्यांनी सदर दावा फेटाळत मनसेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. 

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला सोबत घेण्याची स्वत: राज ठाकरेंची इच्छा आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण याचा अर्थ हा निर्णय नाही. कारण प्रत्येकाचे  या राज्यात स्थान आहे. शिवसेनेचे आहे, डाव्या पक्षाचे स्थान आहे, तसेच काँग्रेसचेही स्थान आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी, आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे स्वतः स्पष्ट करतील, असे निक्षून सांगितले. यावर काँग्रेस नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा पक्षात झाली नसल्याचे म्हटले आहे. 

मनसेवर चर्चा झाली नाही

राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला म्हणाले की, मनसेसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणताही चर्चा झालेली नाही. मित्रपक्षांशीही यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. परंतु, आघाडी किंवा युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत, असे चेन्नीथला यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. या बैठकीत मुंबईमध्ये स्वतंत्र आणि स्वबळावर लढावे, अशी मागणी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी केल्याची आणि आपल्या भावना काँग्रेसच्या हायकमांडकडे पोहोचवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  

 

English
हिंदी सारांश
Web Title : Raut Wants Alliance with Raj Thackeray; Congress Denies Talks

Web Summary : Sanjay Raut claims Raj Thackeray desires Congress alliance, but Congress leaders deny any discussions regarding MNS for upcoming local elections. Congress prefers contesting independently.
टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसMNSमनसेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरे