शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 11:21 IST

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या घरी उद्धव ठाकरेंना मागे बसवल्याच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन सहकुटुंब भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मागे बसवण्यात आल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली अशा शब्दात शिंदे गटाने टीका केली आहे. तर भाजपने उद्धव ठाकरेंचा बैठकीचा फोटो शेअर करत स्वाभिमान शोधून दाखवा असं म्हटलं. सत्ताधाऱ्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीत घोटाळे झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची राहुल गांधी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देखील राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यावर प्रेझेंटेशन दिलं. त्यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागे बसले होते. यावरुनच उद्धव ठाकरे यांना मागे का बसवलं अशी चर्चा सुरु झाली. दुसरीकडे भाजपकडूनही उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर आता संजय राऊत यांनी स्क्रीन समोर बसून पाहताना त्रास होत असल्यामुळे मागे बसल्याचे म्हटलं.

"आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन सुरू होतं. उद्धव ठाकरे यांना पुढे बसवण्यात आलं होतं. स्क्रीन समोर बसून पाहताना त्रास होत असल्याने आम्ही सगळेच पाठीमागे गेलो. ती बसायची जागा नव्हती. तिथे प्रेझेंटेशन सुरू होतं. भाजपचे जे फालतू लोक आहेत त्यांना समजायला हवं. उद्धव ठाकरे यांचे तुम्ही आणखी फोटो पाहिले नाहीत का," असा सवाल संजय राऊत म्हणाले.

"उद्धव ठाकरे यांच्याच कुटुंबाला राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय भेटले. राहुल गांधी यांचे नवीन घर दाखवण्यात आले. भाजपच्या वोट चोरी विरोधात हे प्रेझेंटेशन सुरू होतं. पुढून पाहण्यात थोडा त्रास होत असल्याने आम्ही मागे बसलो होतो. प्रमुख नेत्यांना पुढे बसवण्यात आला होतं. उद्धव ठाकरे हे टेक्निकल गोष्टीमध्ये थोडे तज्ञ आहेत इथून नीट दिसणार नाही म्हणून ते मागे आले, असंही संजय राऊत म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे... शिवरायांचा वारसा सांगता ना रे... खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे? बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे? काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे... तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे! महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे. थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा  ना रे, महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे," अशी टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा