शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

"पाहत रहा, पुढे काय काय होतं"; EVM वरुन टीका करताना संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:23 IST

खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ईव्हीएमवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० चा आकडाही पार करता आला नाही. तर महायुतीमधल्या भाजपनेच १३२ जागा मिळवल्या आहेत. या पराभवामुळे महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाने ईव्हीएमवरुन शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट करत सूचक विधान केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर  महाविकास आघाडीचे नेते ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचे आरोप करत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत जनमत चोरणाऱ्याला देश आणि जनता कधीही माफ करणार नाही, असं म्हटलं आहे. यासोबत ईव्हीएमवरुनही राऊतांनी टीका करत पुढे काय होतं ते पाहा असं सूचक विधान केलं आहे.

संजय राऊतांनी एक्सवर ज्याचे ईव्हीएम त्याची लोकशाही असं लिहीलेलं एक पोस्टर शेअर केलं आहे. त्यासोबत जनमत चोरणाऱ्याला देश आणि जनता कधीही माफ करणार नाही. पाहत रहा, पुढे काय काय होतं ते. जय हिंद!, असं कॅप्शन दिलं आहे. 

याआधीही संजय राऊत यांनी ईव्हीएमवरुन भाजपवर निशाणा साधला होता. "गेल्या १० वर्षांपासून आम्ही यावर प्रश्न उपस्थित करत आहोत. काँग्रेस सत्तेत असताना भाजपने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. ईव्हीएम ही देशातील फसवणूक असून ईव्हीएम नसतील तर भाजपला संपूर्ण देशात २५ जागाही मिळणार नाहीत," असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.

"महाराष्ट्र आणि हरियाणामधून आलेले निकाल आम्ही स्वीकारत नाही. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मग आम्ही ते निकाल स्वीकारू. ज्या संसदेत भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षनेत्याचा माईक बंद केला जातो, तिथे आम्हाला कोणता न्याय मिळणार? सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देत नसेल तर संसद आम्हाला काय न्याय देणार?," असाही सवाल संजय राऊत यांनी केला होता. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sanjay Rautसंजय राऊतEVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेसBJPभाजपा