शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:28 IST

Sanjay Raut on Pahalgam Terror Attack: खासदार संजय राउत यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला.

Sanjay Raut on Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. पण, अद्याप निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडणारे हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी पकडले गेलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहिम राबवली आहे. दरम्यान, आता या मुद्द्यावरुन शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.

मीडियाशी संवाद साधताना शुक्रवारी संजय राऊत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा केला. ते म्हणाले की, 'पहलगाम हल्ल्यातील सहा दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत, कारण एक दिवस तुम्हाला भाजप कार्यालयातून एक प्रेस नोट मिळेल, ज्यामध्ये असे म्हटले जाईल की, ते सहाजण भाजपमध्ये सामील झाले आहेत,' अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

सरकारच्या शिष्टमंडळावर राऊतांची टीकाअलीकडेच संजय राऊत यांनी सरकारच्या शिष्टमंडळावरही टीका केली होती. म्हणाले होते की 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्राने खासदारांचे बहुपक्षीय शिष्टमंडळ अशा अनेक देशांना भेट देण्यासाठी पाठवले आहे, ज्यांचा भारत-पाकिस्तान मुद्द्याशी काहीही संबंध नाही. सरकारला वास्तवापेक्षा दिखाव्यामध्ये रस आहे. भारत-पाकिस्तान मुद्द्याशी काहीही संबंध नसलेल्या देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवण्याची काय गरज आहे? लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओन सारख्या देशांची निवड गंभीर प्रश्न उपस्थित करते. ते शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा संदर्भ देत होते.

पहलगाम हल्ल्यातील मारेकरी अद्याप फरारगेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारुन सहा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26  पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा हल्ला पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचीच एक संघटना टीआरएफच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. केंद्राने याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे 9 अड्डे नष्ट केले. याशिवाय, पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी आणि त्याचा दहशतवादी चेहरा जगसमोर आणण्यासाठी विविध प्रकारे कारवाई केली जात आहे.

'...तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते', राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरुन मोठा खुलासा

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा