शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'सुजय भाजपात गेला, तुम्ही शिवसेनेत या'; राधाकृष्ण विखेंना संजय राऊतांची ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 14:51 IST

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेनं राधाकृष्ण विखे पाटील यांना आमंत्रण दिलं आहे.

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती पक्षाचा झेंडा दिला आणि नगर जिल्ह्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारीही सोपवली. या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेनं राधाकृष्ण विखे पाटील यांना आमंत्रण दिलं आहे. सुजय भाजपात गेला, आता तुम्ही शिवसेनेत येऊन युती मजबूत करा, अशी ऑफर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. 

डॉ. सुजय विखे यांचं खासदारकीचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जातंय. नगर लोकसभेसाठी भाजपाच्या निवड समितीकडे त्यांच्या नावाची शिफारस करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टच केलं आहे. त्यांचं तिकीट कन्फर्म झाल्यास राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेणार, मुलाच्या विरोधात प्रचार करणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच, शिवसेनेनं 'मौके पे चौका' मारला आहे.

आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या  सुजय विखेपाटील यांची नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील यांच्या नावाची शिफारस केंद्रीय संसदीय समितीकडे करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश आणि उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, '' सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना कुठलीही अट घातलेली नाही. मात्र भाजपामध्ये सुजय विखे यांचे नेतृत्व चांगल्या प्रकारे उदयास येईल. त्यामुळे पक्षानेही त्यांच्याबाबत योग्य असा निर्णय घेताना नगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुजय विखे यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी देण्याचे सर्वाधिकार संसदीय समितीकडे आहेत. मात्र आमच्याकडून झालेल्या शिफारशीला मान्यता मिळेल, असा विश्वास आहे. आता नगरची जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक