शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut ED action: 'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 17:51 IST

'शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.'

Sanjay Raut ED action: पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी 7 वाजेपासून राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी त्यांची चौकशी सुरू होती. ईडीच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांकडून राऊतांची सूमारे 9 तास चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

संबंधित बातमी- "...याहीपेक्षा मोठे स्फोट मी करत राहीन"; ईडीने ताब्यात घेतल्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या घराबाहेर शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील जमू लागले. त्यामुळे सुरक्षेसाठी पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले. आता ईडी कार्यालयात राऊत यांचा जबाब नोंदवला जाईल. दरम्यान, संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी परत एकदा 'झुकेंगे नहीं'चा नारा दिला. 

काय म्हणाले राऊत?ईडीच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, मी महाराष्ट्राशी कधीच बेईमानी करणार नाही. ते मला अटक करत आहेत, मी अटक व्हायला तयार आहे. शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे.'

'महाराष्ट्र कमजोर होतोय''मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आम्ही लढणार, शिवसेना अन् महाराष्ट्र इतका कमजोर नाही. माझ्याविरोधात खोटी कारवाई, खोटे खटले टाकले. काहीही झाले तरी मी पक्ष सोडणार नाही.' राऊतांवरील कारवाईवर आमदार संजय शिरसाट यांनी आनंद व्यक्त केला. त्यावर बोलताना राऊत म्हाले की, 'पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतोय, तुम्ही पेढे वाटत बसा. बेशरम लोक आहात तुम्ही,' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय