शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गॅस संकटाच्या नावाखाली संजय राऊतांचे घबराट निर्माण करण्याचे हीन राजकारण; भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:28 IST

Sanjay Raut vs BJP: "राज्यात गॅसटंचाई नाही, बुकिंग केल्यावर दोन दिवसांत घरगुती गॅस सिलेंडर मिळतोय," असेही भाजप नेते म्हणाले

Sanjay Raut vs BJP: इराण-इस्रायल युद्धाचा फटका जगातील बहुतांश देशांना बसत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारत सुरक्षित असल्याचे पाहवत नसल्याने संजय राऊत, उबाठा गट, काँग्रेस हे गॅस व इंधन संकटाचा बागुलबुवा उभा करून त्याच्या नावाखाली सामान्य जनतेमध्ये घबराट निर्माण करण्याचे घाणेरडे राजकारण खेळत असल्याचा प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"देशात ५० लाख गॅस सिलेंडर रोज पुरवले जात आहेत, होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची आयात सुरळीत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. इंधन आयातीसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब, इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात वाढ करणे यासारख्या उपाययोजना करून केंद्र सरकार युद्धपातळीवर कामाला लागले असताना राऊत आणि काँग्रेस गॅस टंचाईच्या नावाखाली जनतेच्या मनात भीती निर्माण करत आहेत," असा घणाघात त्यांनी केले.

"राज्यात गॅस टंचाई नाही, नागरिकांना बुकिंग केल्यावर दोन दिवसांत घरगुती गॅस सिलेंडर मिळत असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जनतेत घबराट निर्माण करण्यासाठी २०१२ साली काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्यांचे फोटो व्हायरल करण्याची नामुष्की उबाठा गट आणि काँग्रेसवर ओढवली आहे. सर्व नागरिकांना गॅस पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि त्या जबाबदारीचे भान सरकारला असून ही जबाबदारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत निभावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुती सरकार करत आहे," असे ते म्हणाले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारताकडे वाकड्या नजरेने बघायची कुणाची हिंमत होत नाही मात्र दुर्दैवाने संजय राऊत रोज आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघतात अशी टीका श्री. बन यांनी केली. इराण आणि इस्राईल युद्धाचा फटका आपल्या देशाला बसायला हवा अशी राऊतांची इच्छा आहे. गॅस, इंधन, उर्जा संकटाच्या नावाखाली देशात अराजक पसरण्याचा घाणेरडा घाट राऊतांनी घातला  आहे. परंतु राऊतांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण देशातील १४० कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास आहे," असे त्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Slams Sanjay Raut for Spreading Panic Over Gas Crisis

Web Summary : BJP accuses Sanjay Raut of fear-mongering about a gas crisis amid the Iran-Israel conflict, alleging he's playing dirty politics. The government is working to ensure uninterrupted gas supply, and there is no need to panic. Raut wishes the country ill, says BJP.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा