शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:28 IST

कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत असा आरोप संजय राऊतांनी भाजपावर केला.

मुंबई -  देवेंद्र फडणवीसांनी सुपाऱ्या घेऊन बोलू नये. महाराष्ट्रात शिवसेनेला सुपारी घेण्याची गरज भासली नाही. शिवसेना फोडायची गरज कोणाला पडली? तुमच्यात हिंमत असेल तर समोर या, सुपारी घेऊन हल्ले करू नका. आतापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत संयमाने आम्ही विधाने केली. पण तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर लक्षात घ्या, कागदावर तुम्ही शिवसेना वेगळी केली असेल पण त्या कागदालाही वाळवी लागलीय असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला. 

संजय राऊत म्हणाले की, कोकणची जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे. स्थानिक भूमिपूत्रांना विषारी जहरी प्रकल्प नको असेल आणि त्यासाठी ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेना छातीवर घेईल. बारसू प्रकल्पाबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. उद्योग राहिला पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे. उद्योग जगला तर कामगार जगेल ही आमची भूमिका कायम आहे. मग एअर बस, फॉक्सकॉन वेदांत हे बाहेर का गेले? त्यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावे. कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत. बारसू प्रकल्पाजवळ अनेक धनिकांनी जमीन घेतले असा आरोप त्यांनी केला. 

मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीस खोटे बोलतात २०२४ मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवणार असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, देवेंद्र फडणवीस खोटे बोलतात. त्यांच्या अंतरंगात काय ते आम्हाला माहिती, इतका अपमान सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. बोलतात एक पण त्यांच्या अंतरंगात जी वेदना आहे ती जवळच्या लोकांना माहिती आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचे अंतरंग धगधगतंय असं राऊतांनी सांगितले. 

अमित शाह देशाचे गृहमंत्री कमी, भाजपा नेते जास्त वाटतातअमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी खरेतर काश्मीरात जास्त जायला हवं. जिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तिथे जायला हवं. परंतु त्यांना महाराष्ट्रावर जास्त प्रेम दिसतंय. सरकार अस्थिर आहे. सोंगटे आणि गोटे हलवायचे असतील तर त्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतील. अमित शाह हे गृहमंत्री कमी आणि भाजपा नेते जास्त वाटतात. या देशाला उत्तम गृहमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्रालाही निष्पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे. पाठीमागे सरदार पटेल फोटो लावून चालत नाही असा टोला राऊतांनी शाह यांना लगावला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस