शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

“कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे-२ सरकार येणार”; संजय राऊतांचे मोठे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:59 IST

Sanjay Raut News: आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut News: आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. महायुतीला लोकसभेचा सर्व्हेही अनुकूल नव्हता आणि विधानसभेचाही नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार, म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार येणार, हे कोणीही थांबवू शकत नाही, असे भाकित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा करू द्या. कितीही योजना आणा, पैशांचा धुरळा उडवा, मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करा. पण निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतील. विधानसभेची निवडणूक घेण्याची त्यांची इच्छा नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. नोव्हेंबरमध्ये त्यांना विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

विधानसभेची निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे, कारण...

हरियाणा, झारखंड, जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्रातील निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील. महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष जागृत आहे, आणि आमचे लक्ष आहे. विधानसभेची निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे, कारण आम्हाला खोकेवाल्यांचे सरकार घालवायचे आहे, असा एल्गार संजय राऊतांनी केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व गद्दार आमदार पुन्हा विधानसभेत दिसणार नाहीत. राज्यातील लाडक्या बहिणी त्यांचा पराभव करतील. आमदारांना ५० कोटी, खासदारांना १०० कोटी तर नगरसेवकांची किंमत ५ कोटी आणि आमच्या लाडक्या बहि‍णींसाठी १५०० रुपये देता का? तेही मते दिली नाहीत तर पैसे परत घेण्याची भाषा करतात. रवी राणा यांच्या पत्नी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल, यावेळी रवी राणांचाही पराभव होणार आहे. योजनेचे पैसे परत घेऊ अशी भाषा अनेक आमदार आणि महायुतीचे नेते करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी