शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

“INDIA मुळे BJPच्या पायाखालची जमीन सरकली, NDAचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:41 IST

Sanjay Raut on INDIA Vs NDA: मूळ एनडीए कुठे आहे, अशी विचारणा करत संजय राऊत यांनी भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Sanjay Raut on INDIA Vs NDA: लोकसभेनंतर दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात  आले. सत्ताधाऱ्यांच्या विजयामुळे आम आदमी पक्ष तसेच विरोधकांना मोठा धक्का बसला. यानंतर मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकाही करण्यात आली. यासंदर्भात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एनडीएचा सर्वांत मोठा पराभव महाराष्ट्रातच होणार असल्याचा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन 'इंडिया आघाडी'ची स्थापना केल्यानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. २०२४ च्या निवडणुकीला सामोर जाण्यासाठी भाजपला आत्मविश्वास राहिला नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष फोडणे सुरू केले आहेत. पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

मणिपूर संदर्भातील मन की बात काय आहे ते स्पष्ट करावी

मणिपूरसारख्या राज्यात चीनचा हस्तक्षेप असल्यामुळे दंगे होत आहेत, असं या देशाचे माजी लष्करप्रमुख समोर येऊन सांगतात. अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबाबदारी आहे की, देशाला मणिपूर संदर्भातील त्यांच्या मन की बात काय आहे ते स्पष्ट करावी. संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपाडयचा त्यांचे काही ऐकायचे नाही आणि आपला कार्यक्रम रेटायचा, याच्यामुळे देशातील एकंदर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी एखाद्या योद्ध्यासारखी संसदेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राहुल गांधी या प्रस्तावावर काय बोलतात? याच्यावर देशाचे लक्ष लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.

मूळ एनडीए कुठे आहे?

शिवसेनेतून तुटलेला एक गट, राष्ट्रवादीतून तुटलेला एक तुकडा आणि मग इतर सगळे गोळा केलेले ताकडे-तोकडे जुळवले आहेत, मूळ एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल, जनता दल, एआयडीएम, तृणमूल काँग्रेस या मुख्य पक्षांनी उभा केलेला एनडीए कुठे आहे? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना बैठक घेऊ द्या, पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार, तो इतिहासातील सर्वांत मोठा पराभव असणार आहे, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा