शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

...म्हणून अजित पवारांवर कडक शब्दात बोललो, त्याचा खेद वाटतो; संजय राऊतांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 11:17 IST

मी राजेशाहीविरोधात बोललो, आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याविरोधात आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं राऊतांनी सांगितले.

नाशिक - अजित पवारांबाबत मला अर्धवट आणि वेगळा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर मी कडक शब्दात उत्तर दिले, त्याचा मला खेद वाटतो, मी असे बोलायला नको होते असं सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे. धरणात मुंतण्यापेक्षा थुंकलेले बरे असं सांगत राऊतांनी अजित पवारांवर शनिवारी प्रहार केला होता. त्यावरून आज राऊतांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांबद्दल मला अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला. अजित पवार असे बोलले नव्हतो. माझा आणि अजित पवारांचा स्वभाव सारखा आहे फार पटकन रिएक्ट होतो. महाराष्ट्रात संयमाने वागले पाहिजे, बोलले पाहिजे असं अजित पवार म्हणाले. पण त्यापुढे संजय राऊतांनी खुलासा केला आहे. त्यांची जीभ दाताखाली आली म्हणून ते थुंकले असं त्यांनी सांगितले. पण पत्रकारांनी अर्धवट माहितीवर प्रश्न विचारला. त्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात उत्तर दिले. मला त्याचा खेद वाटतो. मी असे बोलायला नको होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही सगळे सहकारी आहोत. पवार कुटुंबाशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. अजित पवार हे मविआचे प्रमुख नेते आहेत. जोपर्यंत संपूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही हे मी ठरवले आहे असं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी दिले आहे. 

नवी संसद भवन ही फक्त इमारत, इतिहास नाहीहा देश २०१४ नंतर निर्माण झालाय असं काही जणांना वाटते. देशाला स्वातंत्र्य २०१४ नंतर मिळालंय असं पसरवणे, हा हजारो क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान केल्यासारखे आहे. १९२७ साली जे संसद निर्माण झाले. त्या संसदेला इतिहास आहे. त्यात घटनाकार, स्वातंत्र्यात सहभागी झालेले अनेक नेते होते. त्या संसदेत चालताबोलता इतिहास आहे. आम्ही इतिहास वाचणारी माणसे आहोत. या संसदेत महान लोक बसून गेले. आम्ही त्या इतिहासाचे साक्षीदार आहोत असं आम्हाला वाटायचे. परंतु नवीन इमारतीत ही भावना निर्माण होईल का अशी माझ्या मनात शंका आहे. ज्यापद्धतीची राजवट, धर्मकांड आपण पाहतोय, लोकांना बोलू दिले जात नाही, लिहू दिले जात नाही. लोकांवर दबाव आहे. कायद्याचा गैरवापर करून सरकारे आणली जातायेत. ही हुकुमशाही आहे. नवीन संसद फक्त इमारत आहे इतिहास नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. 

बेईमान, गद्दारांचे इतिहासात काय झाले वाचावेमी राजेशाहीविरोधात बोललो, आम्ही लोकशाहीवादी आहोत. आमच्याविरोधात आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आंदोलन करण्याआधी गद्दार आणि बेईमान या प्रवृत्तीविषयी काय म्हणणे आहे हे सांगावे. त्या काळात क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात बेईमान, गद्दारांना गोळ्या घातल्या आहेत. आम्ही सावरकरांचे उदाहरण दिले. हल्ली गद्दारांचे नाव घेतल्यावर माझी जीभ दाताखाली अडकते ते का कळत नाही. जे आंदोलन करतायेत त्यांनी गद्दारी, बेईमानीबाबत काय झाले त्यासाठी इतिहास वाचावा. शिवशाहीत कडेलोट झाला आहे. या गद्दारांना माहिती आहे. लोकांचा संताप आहे त्यामुळे आंदोलने वैगेरे सुरू आहेत अशी टीका राऊतांनी शिवसेनेवर केली. 

आधी निवडणुका घ्या, मग पाहू५०-५० खोके देऊन सरकार पाडले हे वेगाने काम झाले. इतक्या वेगाने काम कधीच झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही सरकार अजून जागेवरच आहे. वेगाबाबत बोलू नका, आधी निवडणुका घ्या मग कामे दाखवा. निवडणुका घ्यायची हिंमत दाखवा असं आवाहन संजय राऊतांनी केले. तसेच अजित पवार, नाना पटोले हे राज्याचे प्रमुख आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले, हा प्रश्न कुणी कुणाचे समर्थन करण्याचा नसतो. समर्थकांचा अतिउत्साह असतो. नेते होर्डिंग्स लावायला सांगत नाही. या प्रश्नांना जास्त महत्त्व देऊ नका असं राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊत