संजय पाटील हत्याप्रकरणातून विलास उंडाळकरांच्या मुलाची निर्दोष सुटका
By Admin | Updated: October 18, 2014 13:07 IST2014-10-18T13:05:33+5:302014-10-18T13:07:47+5:30
महाराष्ट्र केसरी संजय पाटील याच्या हत्याप्रकरणातून विलास उंडाळकराच्या मुलाची निर्दोष सुटका करण्यात आली ाहे.

संजय पाटील हत्याप्रकरणातून विलास उंडाळकरांच्या मुलाची निर्दोष सुटका
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. १८ - विधानसभा निवडणुकीत क-हाड दक्षिणमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणा-या विलासकाका उंडाळकरांना निकालाआधीच दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र केसरी संजय पाटील याच्या हत्याप्रकरणातून त्यांचा मुलगा उदयसिंह याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. शनिवारी सातारा जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिला.
याप्रकरणी एकूण १२ जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र न्यायालयाने या खटल्यातू १० जणांची निर्दोष सुटका केली असून दोघांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे विलासकाका उंडाळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१५ जानेवारी २००९ साली महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांची क-हाडमध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उदयसिंह यांना ३० जानेवारी २०१३ साली अटक करण्यात आली. आज त्या खटल्याचा निकाल देताना न्यालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.