शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल", शिंदेसेनेच्या नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:04 IST

Sanjay Nirupam on Uddhav Thackeray : "नागपूरच्या दंगलखोरांना उबाठाचा पाठिंबा. मुस्लीम मतांसाठी उबाठा लाचार झाली."

Sanjay Nirupam on Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण तापले आहे. अनेक हिंदू संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमधून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आहेत. यामुळे तिकडे नागपूरमध्ये मोठा हिंसाचारही झाला असून, अनेक शहरांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना(उबाठा) नेते संजय राऊत या मुद्द्यावरुन सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. अशातच आता शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी या वादात उडी घेतली आहे. 

उबाठाला देशातील तैमुरांची काळजीशिवसेना नेते संजय निरुपम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "आज संजय राऊत म्हणाले की, करीना कपूर आणि सैफ अली खान पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेले होते, तेव्हा त्यांना(पीएम) तैमुरची जास्त काळजी वाटत होती. त्यांना ही बाब कशी समजली ते मला माहित नाही. पण, मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की, संजय राऊत आणि संपूर्ण उबाठाला देशातील तैमुरांची खूप काळजी आहे."

राऊतांचे अतिशय लाजीरवाणे वक्तव्यनिरुपम पुढे म्हणतात, "हिंदूमुळे नागपूरमध्ये दंगल भडकली, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले. त्यांचे हे वक्तव्य अतिशय लाजीरवाणे आहे. मी या वक्तव्याचा निषेध करतो. सर्वांना माहितेय नागपूरमध्ये 17 तारखेला सकाळी हिंदू संघटनांनी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विरोध प्रदर्शन केले होते. दुपारपर्यंत हे विरोध प्रदर्शन संपले. पण, त्यानंतर सायंकाळी दंगल भडकवण्यात आली. एखाद्या आक्रमणाप्रमाणे हिंदूबहुल भागात दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या भयंकर दंगलीचा मास्टरमाईंड फईम खानला ताब्यात घेतले आहे. तपासात समोर आले आहे की, त्या फईम खानचा मेंटॉर इंजीनिअर असून, तो सोशल मीडियावर तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय."

मातोश्रीवर औरंगजेबाचा फोटो"अशा दंगलखोरांना उबाठाचे नेते आणि उद्धव ठाकरे पाठिंबा देतात, हे निषेधार्ह आहे. ज्याप्रकारे नागपूरच्या दंगलीनंतर वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत आणि उबाठा औरंगजेबाची बाजू घेतात. यावरुन वाटते की, येणाऱ्या काळात औरंगजेब उबाठाचे आराध्य दैवत होईल. लवकरच मातोश्रीत बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोशेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल. औरंगजेबाचे आणि त्याला मानणाऱ्यांचे समर्थन करणे, हे उबाठाचे नवीन धोरण आहे. मुस्लीम मतांसाठी लाचार होऊन हे करत असतील, तर विधानसभेप्रमाणे येणाऱ्या काळातही त्यांना मोठा झटका बसेल," अशी घणाघाती टीका संजय निरुपण यांनी केली.

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत