शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 21:51 IST

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 351(2), 351(3), 351(4) आणि 192 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. 

काय म्हणाले संजय गायकवाड?बुलढाणा येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संदय गायकवाड म्हणाले की, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते, ते आता बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला मी 11 लाख रुपये देणार. 

गायकवाडांच्या वक्तव्यावर भाजप काय म्हणाले?शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचे भाजपने समर्थन केले नाही. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आमदाराच्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी गायकवाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही. राजीव गांधी म्हणाले होते की, आरक्षण देणे म्हणजे मूर्खांना पाठिंबा देणे. आता राहुल गांधी म्हणतात की मी आरक्षण संपवणार. आम्ही एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना जागरूक करू आणि राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल त्यांना माहिती देऊ, असे बावनकुळे म्हणाले. 

नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशाराशिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा... ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसे गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Gaikwadसंजय गायकवाडcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNana Patoleनाना पटोले