शहरं
Join us  
Trending Stories
1
White House Shooting: गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता विदेशातील प्रत्येक नागरिकाला..."
2
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
3
धक्कादायक! ज्याला मुलगा मानले, त्याच्यासोबतच प्रेमसंबंधाचे टोमणे, दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
4
"ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच घरी जाऊन..."; नीलेश राणेंच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर भाजप प्रदेशाध्यक्षांचे थेट प्रत्युत्तर
5
नोकरी सोडली किंवा काढलं, आता २ दिवसांत होणार फुल अँड फायनल सेटलमेंट! नव्या 'लेबर लॉ'नं बंदलला खेळ
6
कोट्यवधी कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा! क्रेडिट स्कोअरबाबत मोठा निर्णय; कर्ज आणि EMI त्वरित होईल स्वस्त!
7
Mohammed Siraj: "एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातून प्रवास करू नका" सिराज असं का म्हणाला?
8
लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध
9
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
10
Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
11
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
12
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
13
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
14
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
15
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
16
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
17
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
18
Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी
19
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)
20
IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

संजय बियाणींच्या हत्येचा कट परभणीत शिजला?, निनावी लेटर बॉम्बने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 06:18 IST

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला आठवडा लोटला आहे; परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती विशेष काही लागले नाही.

नांदेड :

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला आठवडा लोटला आहे; परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती विशेष काही लागले नाही. त्यात बियाणी यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे मात्र खळबळ उडाली आहे. या पत्रात बियाणींच्या हत्येचा कट परभणीत रचला असून, त्यासाठी नांदेडातील एक दादा परभणीत आला होता, असा हिंदीतून मजकूर आहे. त्यामुळे खरंच हत्येचा कट परभणीत रचला की पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कुणी हे पत्र पाठविले, याचा तपास सुरू आहे.  

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या घरासमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर असल्याचे दिसून येते. या प्रकरणात पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीचे विश्लेषण सुरू आहे. त्यात आता बियाणी यांच्या घरी आलेल्या निनावी पत्रामुळे खळबळ उडाली आहे. 

काय आहे निनावी पत्रात? हिंदी भाषेत अन् मोडक्या-तोडक्या शब्दांत हे पत्र आहे. त्यात बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत रचला आहे. आनंद नगर येथील एक मोठा दादा त्यासाठी परभणीला होता. त्याने अगोदर एकाच्या मुलाला मारले होते. तो मोठा रेती माफिया आहे. बिल्डरच्या कामात कोणी राहू नाही, असा उद्देश होता. असा मजकूर पत्रात आहे.  पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्न निनावी आलेल्या या पत्रामुळे खळबळ उडाली आहे; परंतु हे पत्र पोलिसांचा तपास भरकटविण्याचा प्रयत्नही असू शकतो. कदाचित पोलीस प्रकरणाचा उलगडा करण्याच्या जवळ पोहोचले असतील, त्यामुळे एखाद्याने हा खोडसाळपणा करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर केला नाही? अशीही शंका घेतली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी