पॅट परीक्षेसाठी सफाई कामगार बनले पर्यवेक्षक, शिक्षक निवडणूक कामात; इकडे परीक्षेत सावळा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 08:34 IST2026-04-12T08:29:32+5:302026-04-12T08:34:14+5:30

PAT Exam News: मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक कामात व्यस्त झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता २ री ते ९ वी साठीच्या पिरियॉडिकल असेसमेंट परीक्षेदरम्यान (पॅट) सफाई कामगारांनाच पर्यवेक्षक तसेच विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या.

Sanitation workers became supervisors for PAT exam, teachers in election work; There was chaos in the exam here | पॅट परीक्षेसाठी सफाई कामगार बनले पर्यवेक्षक, शिक्षक निवडणूक कामात; इकडे परीक्षेत सावळा गोंधळ

पॅट परीक्षेसाठी सफाई कामगार बनले पर्यवेक्षक, शिक्षक निवडणूक कामात; इकडे परीक्षेत सावळा गोंधळ

मुंबई - मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक कामात व्यस्त झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता २ री ते ९ वी साठीच्या पिरियॉडिकल असेसमेंट परीक्षेदरम्यान (पॅट) सफाई कामगारांनाच पर्यवेक्षक तसेच विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. त्यामुळे परीक्षार्थींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक समस्यांचे निराकरण करताना एकच गोंधळ उडाला. एकंदर परीक्षेत सावळा गोंधळ पहायला मिळाला. पश्चिम उपनगरातील के ईस्ट अंधेरीमध्ये गुंफा इंग्लिश पालिका शाळा आणि इतर शाळांमध्ये असा प्रकार घडल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

महापालिका आयुक्तांनी २ एप्रिल रोजी विविध विभागांतून सुमारे ७००० कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये आरोग्य विभागानंतर सुमारे २ हजार ३३३ शिक्षकांना बीएलओ कामासाठी नियुक्त करण्यात आले. परिणामी, शाळांतील नियमित शैक्षणिक कामकाजावर  त्याचा  परिणाम झाला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ११ एप्रिलपासून प्रथम भाषेची परीक्षा सुरू झाली. मात्र, शिक्षक मोठ्या प्रमाणात निवडणूक कामात गुंतले असल्याने परीक्षा व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या. 

मतदार सखोल परीक्षणासाठी महापालिकेने २,००० पेक्षा अधिक शिक्षकांना बी एल ओ कामाचे आदेश दिलेले आहेत. परंतु, परीक्षेवेळी शाळेत सफाई कर्मचाऱ्यांना ड्युटी संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाहीत.
- अविनाश ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

मुख्याध्यापक म्हणतात, शिक्षक राष्ट्रीय कर्तव्यावर
शिक्षक राष्ट्रीय कर्तव्याचे काम करण्यात अडकले. निवडणुकीची कामे हे त्यांचे राष्ट्रीय कर्तव्याचेच काम आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. तर वार्षिक परीक्षेसारख्या  काळात  सफाई कामगारांना शिक्षकांची कामे देणे हे पूर्णतः अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रीया प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विकास घुगे यांनी दिली.

Web Title : परीक्षा में अराजकता: शिक्षक चुनाव ड्यूटी पर, सफाईकर्मी बने पर्यवेक्षक

Web Summary : मुंबई के स्कूलों में परीक्षा में व्यवधान; शिक्षक चुनाव ड्यूटी पर थे। सफाई कर्मचारियों ने परीक्षाओं की निगरानी की, जिससे भ्रम पैदा हुआ। नगरपालिका ने चुनाव कार्य के लिए कर्मचारियों की नियुक्ति की, जिससे शिक्षा प्रभावित हुई। अधिकारियों का कहना है कि शिक्षक राष्ट्रीय कर्तव्यों का पालन कर रहे हैं।

Web Title : Exam Chaos: Cleaners Supervise as Teachers Handle Election Duty

Web Summary : Mumbai schools faced exam disruptions as teachers were assigned election duty. Sanitation workers supervised exams, causing confusion. The municipality appointed staff for election work, impacting education. Heads say teachers are fulfilling national duties.