सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळा - अमृता फडणवीस
By Admin | Updated: June 1, 2017 03:33 IST2017-06-01T03:33:10+5:302017-06-01T03:33:10+5:30
महिला बचतगटांमार्फत बनविल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावू नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता

सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळा - अमृता फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला बचतगटांमार्फत बनविल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लावू नये, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली. अमृता फडणवीस यांनी गायलेल्या ‘फिर से’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा विशेष खेळ बुधवारी मुंबईत बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत पार पडला. टी सीरिजने या गाण्याची निर्मिती केली आहे.
अमृता फडणवीस या स्वत: कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून, त्यांना गाण्याची आवड आहे. त्यांनी आतापर्यंत १४ शास्त्रीय आणि भक्तिगीते गायली आहेत. ‘फिर से’ या गीतात मात्र त्यांनी अभिनय आणि नृत्यही केले आहे. एका सामाजिक उद्देशाने या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. कोणत्याही चित्रपटात काम करण्याची आपली इच्छा नसल्याचेही अमृता फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.
अमिताभ बच्चन म्हणाले की, अमृता फडणवीस या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या गीतात काम केले आहे. या गाण्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातील निम्मा हिस्सा शेतकरी साहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे टी सिरीज कंपनीने जाहीर केले आहे.