शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

विशाल पाटील यांचे अमित शाहांना प्रत्युत्तर, म्हणाले, “शरद पवार-ठाकरेंना टार्गेट केले तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 10:26 IST

MP Vishal Patil Replied Amit Shah: भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचे ठरवलेले दिसते आहे, असे सांगत विशाल पाटील यांनी टीका केली.

MP Vishal Patil Replied Amit Shah: महागाई, बेरोजगारी हे देशापुढील प्रमुख मुद्दे आहेत. मराठा समाजाला आरक्षण हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा मिळाले. शरद पवारांकडे सगळेच समाज आशेने पाहतात. भाजपाने शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन नेत्यांना टार्गेट करायचे ठरवलेले दिसते आहे, या शब्दांत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले.

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आरक्षणासह अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पलटवार करण्यात येत आहे. पत्रकारांशी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले तर...

सांगू इच्छितो की शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले तरीही त्यांची सहानुभूती वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी पुण्यात राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलायला हवे होते. परंतु, तसे काही बोलले नाही. हिंदू-मुस्लिम मुद्दा बनवून राज्यात लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला मात्र तो चालला नाही, अशी टीका विशाल पाटील यांनी केली. तसेच २०२४ चा अर्थसंकल्प मांडला जाईल. किमान हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांकडे पाहून मांडला जाईल, अशी अपेक्षा आम्हाला सगळ्यांनाच आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर मला बोलायचे होते पण ती संधी मिळाली नाही, असे विशाल पाटील म्हणाले.

राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे महाविकास आघाडी

राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे आहेत. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केले. कसाबला बिर्याणी खायला देणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले. याकुब मेमनला सोडण्याची मागणी करणाऱ्यांबरोबर ठाकरे बसले आहेत. झाकीर नाईक यांना शांततादूत बनवणाऱ्यांच्या मांडीवर उद्धव ठाकरे बसले आहेत. PFI या संघटनेला पाठिंबा देणाऱ्यांचा मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले आहेत, या शब्दांत अमित शाह यांनी हल्लाबोल केला होता. 

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार