शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

सांगलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसाशी झटापट; कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 20:35 IST

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधान बचाव सभेचे पोलिसाने चित्रीकरण केल्यामुळे सांगलीत बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

सांगली : महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधान बचाव सभेचे पोलिसाने चित्रीकरण केल्यामुळे सांगलीत बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसाशी त्यांची झटापट झाल्यानंतर कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्नही झाला. शेवटी पोलिसाने चित्रीकरण कॅमे-यातून हटविल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. सांगलीच्या राजमती भवनात बुधवारी दुपारी चार वाजता संविधान बचाव अभियानाअंतर्गत राष्ट्रवादी महिला काँग्रेसची सभा आयोजित केली होती. आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्या उपस्थितीत ही सभा होत असल्यामुळे जिल्ह्यातून महिला कार्यकर्त्यांसह पक्षाचे पुरुष पदाधिकारीही मोठ्या संख्येने जमले होते. सभेला सुरुवात झाल्यानंतर खाकी वर्दीतील एका पोलिसाने चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, प्रदेश चिटणीस ताजुद्दीन तांबोळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, माजी महापौर सुरेश पाटील, मैनुद्दीन बागवान आदींनी संबंधित पोलिसाला याबाबत जाब विचारला. चित्रीकरण करण्याचा संबंध काय? निवडणुका नसताना पक्षाच्या कार्यक्रमांवर नियंत्रण का ठेवले जात आहे, असे सवाल उपस्थित करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी पोलिसाकडील कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसाने मला आदेश दिल्याप्रमाणे मी काम करीत असल्याचे स्पष्ट केले. शेवटी चित्रीकरण कॅमे-यातून हटविण्याची मागणी करीत कार्यकर्त्यांनी पोलिसाला घेराव घातला. अर्धा तास हा वाद सुरू होता. त्यानंतर पोलिसाने चित्रीकरण सर्वांसमोर हटविल्यानंतर वाद निवळला आणि कार्यकर्ते शांत झाले. याबाबत ताजुद्दीन तांबोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पक्षाच्या कार्यक्रमात पोलिसांची लुडबूड कशासाठी सुरू आहे, हे कळत नाही. वास्तविक कोणत्याही निवडणुका नसताना हा प्रकार निंदनीय आहे. गेल्या काही दिवसांत पक्षाच्या कार्यक्रमांवर पोलीस वॉच ठेवत आहेत. महिला आघाडीचा हा कार्यक्रम असल्यामुळे किमान महिला कॉन्स्टेबल तरी पाठवायला हवी होती. पुरुष कॉन्स्टेबल येऊन महिलांचे चित्रीकरण करीत असल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले. बंदोबस्तासाठी पोलीस असणे ही बाब समजण्यासारखी आहे, मात्र चित्रीकरण करून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रकारातून दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. याबाबत आम्ही तीव्र शब्दात शासनाच्या या कृतीचा निषेध करीत आहोत. 

हा दडपशाहीचा प्रकार आहे...फौजिया खान म्हणाल्या की, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यक्रमात आम्ही मनुस्मृतीला जोडे मारण्याचे आंदोलन करणार होतो. पोलिसांनी मनुस्मृती काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारला या मनुस्मृतीचा आदर करायचा आहे, हे सिद्ध होते. पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण पोलिसांमार्फत करून दडपशाहीचा मार्ग अवलंबिला आहे. आम्ही तो धुडकावून लावू. या देशात हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस