संदीप सावंत मारहाणप्रकरण ; निलेश राणे यांची सुटका

By Admin | Updated: May 24, 2016 18:16 IST2016-05-24T18:16:59+5:302016-05-24T18:16:59+5:30

माजी खासदार निलेश राणे आज सायंकाळी ४.५८ ला मुक्त झाले. काल खेड सेशन्स कोर्टानं 15 हजारांच्या जात मुचलक्यावर निलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर केला होता.

Sandeep Sawant assault; Nilesh Rane rescues | संदीप सावंत मारहाणप्रकरण ; निलेश राणे यांची सुटका

संदीप सावंत मारहाणप्रकरण ; निलेश राणे यांची सुटका

ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. २४ : माजी खासदार निलेश राणे आज मंगळवारी सायंकाळी ४.५८ ला मुक्त झाले. खेड न्यायालयाच्या जामीनाच्या आदेशाची प्रत घेऊन त्यांचे कार्यकर्ते मंगेश शिंदे दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास चिपळूण कोर्टात दाखल झाले. तेथे दुपारनंतरच्या सत्रात हे प्रकरण न्यायालयासमोर गेले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्ते आदेशाची प्रत घेऊन रत्नागिरीकडे रवाना झाले. दुपारी ३ वाजता राणे यांना पोलीस बंदोबस्तात रुग्णालयातून कारागृहाकडे नेण्यात आले. ४.४९ वाजता आदेशाची प्रत घेतलेली गाड़ी कारागृहासमोर आली. तेथील प्रक्रिया पूर्ण करून ४.५८ वाजता निलेश राणे मुक्त झाले आणि गाडीत बसून रवाना झाले.

काल खेड सेशन्स कोर्टानं 15 हजारांच्या जात मुचलक्यावर निलेश राणेंना सशर्त जामीन मंजूर केला होता. रत्नागिरीत मराठा आरक्षण मेळाव्यास अनुपस्थित राहिल्याबद्दल राणे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप चिपळूण तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप शिवराम सावंत यांनी गेल्या महिन्यात केला होता. त्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.

मात्र निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले होते. संदीपने मागितलेले पैसे मी न दिल्यानं त्यानं माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगत निलेश राणेंनी मारहाणीचे आरोप फेटाळले होते.

Web Title: Sandeep Sawant assault; Nilesh Rane rescues