शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

वाळू उपशाने नद्यांची ‘इको सीस्टिम’च धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 03:47 IST

नदीकाठच्या संस्कृतीला वाळू तस्करांचे नख, पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर अत्यंत प्रतिकूल परिणाम

नदीकाठावर संस्कृती वसते, असे इतिहास सांगतो, पण राज्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रातून सुरू बेलगाम वाळू उपशामुळे नदी व पर्यावरणाच्या नैसर्गिक संतुलनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे भीषण वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये उघड झाले आहे. नदीचे पात्र रुंद व खोल होणे, काही ठिकाणी नैसर्गिक पात्र व प्रवाहच बदलणे, कृत्रिम पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडून निघणे, जलजन्य वनस्पती, कीटक, जलचर प्राण्यांची अंडी नष्ट होणे अशी कधीही भरून न निघणारी हानी होत असल्याचे राज्यातील पर्यावरण तज्ज्ञांनी नमूद केले. ‘लोकमत’च्या ठिकठिकाणच्या चमूंनी नोंदवलेल्या गंभीर बाबी अशा..... 

विदर्भचंद्रपूर  : वर्धा, वैनगंगा, इरई, उमा, शिरणा नद्यांचे नैसर्गिक पात्रच बदलले आहे. कृत्रिम पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन खरवडून निघाली आहे.  वाशीम : पैनगंगा नदीचे पात्र १० ते १५ फूट खाेल गेले आहे. दाेन वर्षांपूर्वी दिग्रस बु गावाजवळील काेल्हापुरी बंधारा फुटून नुकसान झाले हाेते.नागपूर : तस्करांनी कन्हान नदीला लक्ष्य केल्यामुळे पात्रात खड्डे तयार झाले. माती खाेदकामामुळे प्रवाह बदलण्याची शक्यता बळावली आहे. गडचिरोली : जिल्ह्यात ५०० हेक्टर शेतजमिनीच्या हानीचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यात दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे, शेतजमीन वाहून गेल्यासंबंधी ७३६.४६ हेक्टर क्षेत्रात नुकसानाची नोंद झाली आहे. गोंदियात नदीपात्र रुंद झाल्याने ३० गावातील शेतकऱ्यांना फटका बसला.मराठवाडानांदेड : वाजेगाव, वांगी, नागापूर, राहेर, मेळगाव परिसरात गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील गोदावरी, सिंदफणा, मांजरा नद्यांमध्ये खड्डे पडले. औरंगाबादच्या फुलंब्रीतील गिरजा नदीतील उपशामुळे दोनदा महापूर आला.उत्तर महाराष्ट्रधुळे जिल्ह्यात तापी, पांझरा, बुराई या प्रमुख नद्यांच्या पात्रातील खड्ड्यांत बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या. जळगावच्या गिरणा नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीपात्रात खोल खड्डे पडलेत.पश्चिम महाराष्ट्रपुणे जिल्ह्यात दौंड, पुरंदर, शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा होतो. नद्यांमधील जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. मावळ तालुक्यातील नदीकाठच्या जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण झाल्यामुळे पाणी शेतात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. भूजल पातळीतही घट होत चालली आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा प्रमुख नद्या, तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहे. नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडल्याने ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदललेली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड, पुरंदर, शिरूर, खेड, आंबेगाव तालुक्यात यांत्रिक बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा होतो. नद्यांमधील जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. मावळ तालुक्यातील नदीकाठच्या जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम झाला आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण झाल्यामुळे पाणी शेतात घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. भूजल पातळीतही घट होत चालली आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यात कृष्णा, कोयना, माणगंगा, येरळा, नीरा प्रमुख नद्या, तसेच त्यांच्या उपनद्या, ओढे मोठ्या प्रमाणावर आहे. नदीपात्रालगतची सुपीक माती ओरबाडल्याने ठिकठिकाणी नद्यांचे पात्र बदललेली आहे.