समीरचा अर्ज फेटाळला

By Admin | Updated: November 19, 2015 02:06 IST2015-11-19T02:06:21+5:302015-11-19T02:06:21+5:30

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर गायकवाड यास न्यायालयाला महत्त्वाची माहिती द्यायची असून, त्यासाठी त्यास

Sameer's application was rejected | समीरचा अर्ज फेटाळला

समीरचा अर्ज फेटाळला

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर गायकवाड यास न्यायालयाला महत्त्वाची माहिती द्यायची असून, त्यासाठी त्यास हजर करण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी बुधवारी फेटाळला.
आरोपीच्या वकिलांची मागणी मंजूर केल्यास तुरुंग अधिकाऱ्यांच्या हक्कआणि अधिकारामध्ये हस्तक्षेप व ढवळाढवळ होईल, या निकषावर अर्ज फेटाळल्याचे विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी सांगितले, आरोपी लेखी माध्यमातून माहिती देऊ शकतो, असे बुधले यांनी सांगितले.

Web Title: Sameer's application was rejected