शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sameer Wankhede: आज बाळासाहेब ठाकरे असते तर...; क्रांती रेडकरने लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 12:27 IST

Kranti Redkar's letter to CM Uddhav Thackeray: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे महाराष्ट्र सरकारच्या निशान्यावर आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप करत कागदोपत्री तसेच फोटो, व्हिडीओद्वारे पुरावे दिले आहेत.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे महाराष्ट्र सरकारच्या निशान्यावर आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप करत कागदोपत्री तसेच फोटो, व्हिडीओद्वारे पुरावे दिले आहेत. यामुळे समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच थेट पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने शिवसेनेच्या राज्यात एका महिलेच्या प्रतिष्ठेसोबत खेळ खेळला जात आहे, आज बाळासाहेब असते तर त्यांना हे अजिबात सहन झाले नसते, असे म्हटले आहे. 

आमचा लोकांसमोर दररोज अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीच्या प्रतिष्ठेशी खेळले जात आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांना ते आवडले नसते. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. मला आतापर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही, मी उत्तराची वाट पाहत आहे, असे क्रांती रेडकर म्हणाली. 

पत्रात म्हटलेय की, शिवसेनेला मराठी माणसासाठी लढताना पाहत मी मोठी झाली आहे. मी मराठी मुलगी आहे. बाळासाहेब, शिवाजी महाराजांकडून शिकले की, कोणावर अन्याय करू नका, स्वत:वर अन्याय झाला तर सहन करू नका. त्याच ताकदीवर मी आज एकटी माझ्या खासगी आयुष्यावर हल्ला करणाऱ्या लोकांविरोधात मजबुतीने उभी आहे आणि लढत आहे. 

सोशल मीडियावर लोक केवळ मजा पाहत आहेत. मी एक कलाकार आहे, राजकारण मला समजत नाही आणि त्यात पडायचे देखील नाही. आमचा काही संबंध नसताना रोज सकाळी आमची इज्जत चव्हाट्यावर मांडली जात आहे. शिवसेनेच्या राज्यात असे होत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे अजिबात आवडले नसते, असे क्रांती रेडकरने म्हटले आहे. 

तुम्हीच न्याय करावा...एक महिला आणि तिच्या कुटुंबावर खासगी स्तरावर हल्ले होत आहेत, हे खालच्या पातळीवरील राजकारण आहे. आज बाळासाहेब ठाकरे नाहीत, पण त्यांची सावली आम्ही तुमच्यात पाहतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. मराठी असल्याने मी तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही न्याय करावा, अशी अपेक्षाही क्रांती रेडकरने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेKranti Redkarक्रांती रेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी