शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

तीन लोकांनी घराची रेकी केली, कुटुंबाला धोका! समीर वानखेडेंच्या पत्नीनं केली संरक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 22:02 IST

समीर वानखेडे हे क्रुझ ड्रग्स प्रकरण समोर आल्यापासूनच  चर्चेत आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह कोही लोकांना अटक करण्यात आली होती.

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी पती समीर आणि कुटुंबीयांची सुरक्षितता धोक्यात असल्याचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी तिन लोकांनी आमच्या घराची रेकी केली असून आम्ही पोलिसांना त्याचे सीसीटीव्ही फुटेजही देऊ, असे सांगत, आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणी क्रांती रेडकर यांनी केली आहे.

समीर वानखेडे हे क्रुझ ड्रग्स प्रकरण समोर आल्यापासूनच  चर्चेत आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह कोही लोकांना अटक करण्यात आली होती. यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने नवनवे आरोप करत आहेत. मलिक यांनी नुकताच दावा केला होता, की समीर वानखेडे आणि त्याचे कुटुंब मुस्लीम आहे आणि सरकारी नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केले. पण, समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

क्रांती रेडकर यांचा 2017 मध्ये समीर वानखेडे यांच्याशी विवाह झाला आहे. नुकतेच, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, मलिक आपल्या पतीवर खोटे आरोप करून घाणेरडे राजकारण करत असल्याचे क्रांती यांनी म्हटले होते.

रामदास अठावलेंचं वानखेडेंना समर्थन -केंद्रीय मंत्री रामदास आठवले आता समीर वानखेडे यांच्या समर्थनात पुढे आले आहेत. ते म्हणाले, "मी नवाब मलिक यांना सांगू इच्छितो, की त्यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करणे थांबवावे. जर ते म्हणत असतील, की समीर मुस्लीम आहेत, तर मग मुसलमानावर आरोप का करत आहात." आठवले म्हणाले, रिपब्लिकन पार्टी समीर वानखेडे यांच्यासोबत उभी आहे. समीर यांना कसल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

 

टॅग्स :Kranti Redkarक्रांती रेडकरSameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो