शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात समीर भुजबळांना हायकोर्टाकडून जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:14 IST

गेल्याच महिन्यात छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला होता

मुंबई: मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांना जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं समीर भुजबळांना जामीन मंजूर केला आहे. गेल्याच महिन्यात मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला होता. यानंतर आता दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामातील कथित घोटाळा आणि कंत्राटांच्या बदल्यात काळ्या पैशांची कमाई केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या समीर भुजबळांनाही जामीन मिळाला आहे. 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट' (पीएमएलए) या कायद्यातील कलम ४५विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा लाभ समीर यांना मिळू शकत नाही, असे म्हणत सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मंगळवारी समीर यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला होता. विविध कायदेशीर मुद्यांवरील त्यांचा युक्तिवाद मंगळवारी पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे न्या. अजय गडकरी यांनी आज दुपारी ३ वाजता पुढील सुनावणी ठेवली होती. सिंग यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्तींनी निकाल सुनावला आणि समीर भुजबळांना जामीन मिळाला. यापूर्वी याच गुन्ह्यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जवळपास सव्वा दोन वर्षांनंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांनी जामीन मंजूर केला होता.  

टॅग्स :Sameer Bhujbalसमीर भुजबळChagan Bhujbalछगन भुजबळMONEYपैसा