शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Sambhajiraje Chhatrapati: मोठी घडामोड! कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखाला 'मातोश्री'चं बोलावणं, संभाजीराजेंचं ठरेना, शिवसेना मागे हटेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 13:19 IST

Sambhajiraje Chhatrapati on the Way of Mumbai: छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शिवबंधन बांधण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू संभाजीराजे पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले होते. आज सकाळी पुन्हा संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले आहेत.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून महाराष्ट्रात राजकीय वादळ आले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत शिवबंधन बांधण्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतू संभाजीराजे पहाटेच कोल्हापूरकडे रवाना झाले होते. आज सकाळी पुन्हा संभाजीराजे मुंबईकडे रवाना झाले आहेत. निघण्यापूर्वी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

याच घडामोडींवर एक मोठी बातमी आली आहे. शिवसेनेने कोल्हापूरच्या जिल्हाप्रमुखांना मातोश्रीवर येण्याचे आदेश दिले आहेत. संभाजीराजे मुंबईला निघण्याआधीच जिल्हा प्रमुख संजय पवार यांना मातोश्रीवरून फोन आला, त्यांना तातडीने मुंबईकडे निघा, असे आदेश देण्यात आले आहेत. 

संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. गेली तीस वर्षे ते सीमालढ्यात सक्रीय आहेत. दोनदा नगरसेवकही राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला ही जागा सोडली होती. यामध्ये शिवसेनेने काँग्रेसला मदत केली होती. संभाजीराजेंकडून काहीच सिग्नल येत नसल्याने शिवसेनेने सहाव्या उमेदवाराची तयारी सुरु केली आहे. संजय पवार हे मातोश्रीच्या खूप जवळचे आहेत. कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांची जबाबदारी संजय पवारांकडे आहे. यामुळे त्यांना मातोश्रीवरून निरोप येणे खूप महत्वाचे मानले जात आहे. 

Sambhaji Raje : संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा; मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मुंबईकडे रवाना, सर्वांचं लागलं लक्ष

संभाजीराजे काय म्हणाले...संभाजीराजे यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. संभाजीराजे आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्मान राखतील अशी अपेक्षा असल्याचं, मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झालीय. सविस्तर बोलणं झालेलं आहे. पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, असं संभाजीराजे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा