रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरून प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी हाणून पाडला, तक्रारीनंतर पुरातत्व विभागाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 05:53 PM2022-01-06T17:53:28+5:302022-01-06T17:56:00+5:30

Raigad: रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती शिवप्रेमींनी दिल्यानंतर Sambhaji Raje Chhatrapati यांनी याबाबत पुरातत्व खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने त्वरित कारवाई करून सदरचे ठिकाण पूर्ववत केले आहे. तसेच तिथे सुरक्षा रक्षकाची नियुक्तीही करण्यात आली आहे.

Sambhaji Raje thwarted the attempt to build a place of worship by spreading sheets on Raigad. | रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरून प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी हाणून पाडला, तक्रारीनंतर पुरातत्व विभागाची कारवाई 

रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरून प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न संभाजीराजेंनी हाणून पाडला, तक्रारीनंतर पुरातत्व विभागाची कारवाई 

googlenewsNext

मुंबई/रायगड - स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर रंगरंगोटी करून चादर पसरवून धार्मिक प्रार्थनास्थळ उभे करण्याचा प्रयत्न संभाजीराजे छत्रपती यांनी हाणून पाडला आहे. रायगडावर प्रार्थनास्थळ उभारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची माहिती शिवप्रेमींनी दिल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत पुरातत्व खात्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने त्वरित कारवाई करून सदरचे ठिकाण पूर्ववत केले आहे. तसेच तिथे सुरक्षा रक्षकाची नियुक्तीही करण्यात आली आहे.

याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबूक पोस्टवरून माहिती दिली आहे. ते म्हणाले की, दुर्गराज रायगडावरील मदार मोर्चा येथील प्रकाराची दखल घेत आज सकाळीच मी पुरातत्त्व विभागास पत्र लिहून केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावतीजी आणि मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला. तसेच तात्काळ याविषयी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचित केले. यास प्रतिसाद देत पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. तसेच त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

दरम्यान, याबाबत सकाळी संभाजीराजे छत्रपती पुरातत्व विभागाला एक पत्र पाठवल्याची माहिती दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, किल्ले रायगड येथील 'मदार मोर्चा' या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी रंगरंगोटी करून चादर घालून तिथे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक शिवभक्तांनी याबाबत आमच्याशी संपर्क साधून निदर्शनास आणून दिले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाच्या नियमांमध्ये या गोष्टी प्रतिबंधित असताना, किल्ले रायगड सारख्या ऐतिहासिक ठिकाणी अशा गोष्टी होणे अतिशय चुकीचे आहे.  किल्ले रायगडचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व अबाधित राहावे यासाठी मदार मोर्चा याठिकाणी करण्यात आलेली रंगरंगोटी हटवून तिथे कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम अथवा रचना करण्यास तात्काळ पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी या पत्राच्या माध्यमातून केली होती. 
 

Web Title: Sambhaji Raje thwarted the attempt to build a place of worship by spreading sheets on Raigad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.