मोदींच्या हस्ते संभाजीराजेंचा सत्कार

By Admin | Updated: June 14, 2016 03:05 IST2016-06-14T03:05:32+5:302016-06-14T03:05:32+5:30

युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर राष्ट्रपती-नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी अलाहाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात

Sambhaji Maharaj felicitated by Modi | मोदींच्या हस्ते संभाजीराजेंचा सत्कार

मोदींच्या हस्ते संभाजीराजेंचा सत्कार

कोल्हापूर : युवराज संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर राष्ट्रपती-नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सोमवारी अलाहाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिव-शाहू यांचे वंशज असलेल्या संभाजीराजे यांची नियुक्ती ही आमच्यासह संपूर्ण देशासाठी भाग्याची बाब आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले. अलाहाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sambhaji Maharaj felicitated by Modi