शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बेशरम लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 10:28 IST

'कोरोना हा थोतांड आहे, चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे.'

सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे(Sambhaji Bhide) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आज शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौदचा समारोप होता, यानिमित्त बोलताना ते म्हणाले की, 'भारत म्हणजे गुलामी, दास्याच्या नरकात राहणाऱ्या बेशरम लोकांचा, देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे,' असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं.

सांगलीत बोलत असताना संभाजी भिडे म्हणाले की, 'जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपल्या देशाचा क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे, कुठल्या गोष्टीत? तो म्हणजे निर्लज्जपणात. जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. पण, पारतंत्र्य, गुलामीत राहण्याचा बेशरमपणा असलेल्या बेशरम लोकांचा आपला देश आहे. दीर्घ काळ परक्यांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे,' असं संभाजी भिडे म्हणाले.

कोरोना काल्पनिक...ते पुढे म्हणतात, 'या देशात देशभक्तीचा, जाणिवेचा प्राण नाही. कशासाठी पोटासाठी खंडाळासाठी इतकीच त्याची लायकी आहे. आपला-परका कोण मित्र कोण हे कळत नाही. या देशात कसली सरकार आहे. हा देश जगाचा बाप बनावा, यासाठी मोठी मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतली होती. ती मोहीम पार पाडण्यासाठी आपण मोहीम करतो. पण, मागच्या वर्षी आपल्या या कर्तृत्वसंपन्न शासनाने महाराष्ट्रात कोरोनाचे कारण देत नकार दिला. कोरोना हा काल्पनिक आहे, कोरोना हा ना स्त्री ना पुरुष यांना न होणारा कोरोना आहे. कोरोना हा थोतांड आहे. चीनने तुम्हाला आणि आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत