आत्मसाक्षात्काराचा समाधी सोहळा
By Admin | Updated: November 14, 2014 23:44 IST2014-11-14T23:44:43+5:302014-11-14T23:44:43+5:30
आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येर्पयत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे.

आत्मसाक्षात्काराचा समाधी सोहळा
दुरितांचे तिमिर जावो ।
विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो ।
जो जे वांछिल तो ते लाहो ।
प्राणिजात ।।
आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येर्पयत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व आहे. आत्मसाक्षात्कार आणि ज्योतिप्रकाशाचे दर्शन घडल्यानंतर, ज्ञानदेवांनी घेतलेला समाधीचा निर्णय ऐकून सर्व संत महंत वारकरी दु:खीत अंतकरणाने या सोहळ्यात सहभागी झाले व ज्ञानेश्वर महाराज आनंदाने त्रयोदशीला समाधिस्थ झाले. याची आठवण म्हणून दर वर्षी वारकरी संजीवन समाधी सोहळ्यासाठी आळंदीत जमतात.
पंढरपूरहून संत महंत, साधू-संन्यासी आणी वारकरी आपापल्या दिंडय़ा घेऊन ज्ञानेश्वर व भावंडांसह ज्ञानेश्वरांचा जयघोष करीत कार्तिक अष्टमीला आळंदीक्षेत्री आले. आळंदीकरांना हा समुदाय पाहून आश्चर्य झाले. तेव्हा नामदेवांनी येत्या कार्तिकी त्रयोदशीला ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ होणार असल्याचे कारणासहित सांगितले. हे ऐकताक्षणीच आळंदीकर शोकाकुल झाले. तेव्हा निवृत्तीनाथांनी सांत्वन केले. सिद्धेश्वराच्या समोर असलेल्या नंदीखालच्या विवरात ज्ञानेश्वरांची समाधी घेण्याची इच्छा असल्यामुळे सर्वानी एकत्र मिळून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधिस्थळाचा परिसर स्वच्छ केला. आळंदी परिसरात संत वारक:यांच्या राहुटय़ा उभ्या राहिल्या. भजनाचे व कीर्तनाचे कार्यक्रम सुरू झाले. ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडांसह पूर्वीच्या झोपडीवजा घरात उतरले.
कार्तिक नवमीला संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसह सिद्धेबेटावर असलेल्या आपल्या पूर्वाo्रमीच्या झोपडीवजा घरी उतरले. इंद्रायणीमध्ये संतमंडळींबरोबर ज्ञानेश्वरांनी स्नान करून, सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सर्व संतमंडळींची आस्थेने विचारपूस केली. याच दिवशी सायंकाळी ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी प्रवचन दिले. हे प्रवचन ऐकण्यासाठी असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. वारकरी पंथ समानता आणि सहिष्णुतेचे प्रतीक आहे. (वार्ताहर)
4पंढरपूरक्षेत्री चंद्रभागेच्या नदीकाठी संध्यासमयी शांत वातावरणात ज्ञानेश्वर महाराज ओंकाराचे ध्यान करीत असताना, अचानक पौर्णिमेच्या चंद्राकडे ध्यान गेले व परमज्योतीचा हा प्रकाश पाहून त्यांचे डोळे दिपून गेले. अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांना या तेजाचे दर्शन घडले आणि त्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आपले कार्य संपले असून, आपण समाधिस्थ होणो इष्ट असल्याचे वाटू लागले. त्यांनी निवृत्तीनाथांना ज्योतिप्रकाशाचे दर्शन घडले व आत्मसाक्षात्कार झाल्याचे सांगितले. यामुळे मी पूर्णावस्थेला पोहोचलो असून, ही पूर्णावस्था म्हणजेच संजीवन समाधी असून, मी समाधी घेणार असल्याचे सांगितले.
4ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ होणार असल्याची वार्ता पंढरपुरात सर्वत्र पसरली. याची शहानिशा करण्यासाठी साधूसंत, वारकरी मंडळी अमृतेश्वर मंदिरात दाखल झाली. या सर्वाना नामदेवांनी समजावून सांगितले व आळंदीक्षेत्री इंद्रायणी काठी असलेल्या सिद्धेश्वराच्या पावन भूमीत कार्तिक महिन्यातल्या त्रयोदशीला ज्ञानदेव समाधिस्थ होणार असल्याचे सर्वाना सांगितले. या वेळी नामदेवांच्या मुखातून नाथा नको रे अंतरू । तुङया कासेचे वासरू । कळा दुभती त्व गाय । तुझा वियोग असहय । अशी अभंगवाणी बाहेर पडली.
4सोवळे ओवळे, कर्मकांड, जातीभेद यांचे बंधन येथे नाही. फक्त शास्त्रने सांगितलेली विहित कर्म करण्याचे, गुरुजनांचा आदर राखण्याचे, आनंदाने संसार करून परमार्थ साधीत दु:खी कष्टी लोकांची सेवा करण्यामध्येच खरी परेमश्वराची उपासना आहे, असे त्यांनी सांगितले. दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो । जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।। ज्ञानेश्वर माउलींचे हे प्रवचन ऐकून उपस्थित जनसमुदाय कार्तिक नवमीला भारावून गेला. ज्ञानेश्वर माउली । ज्ञानेश्वर माउली । ज्ञानेश्वर माउली.. असा जयजयकार करू लागले.