शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या शाैर्याला सॅल्यूट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा जखमी जवानाला फोन, गडचिरोली पोलिसांचे तोंडभरून काैतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 09:58 IST

Chief Minister Thackeray's phone call to the injured soldier : महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असलेल्या दुर्गम मुरुमभूशी जंगलात गुरुवारपासून पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली होती.

- नरेश डोंगरेनागपूर - शाैर्याची अत्युल्य परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राला तुमच्या धाडसाचा अभिमान आहे. तुम्ही बजावलेली कामगिरी अतुलनीय असून तुमचे काैतूक करावे तेवढे थोडेच आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सरकार आणि जनतेच्यावतीने तुमच्या शाैर्याला सॅल्यूट करतो,अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी नक्षल्यांच्या गुहेत शिरुन त्यांच्या गोळीबाराचा सामना करणाऱ्या सी-६० चे जवान मोहन उसेंडी (वय २७) यांचे शुक्रवारी मध्यरात्री काैतूक केले. (Salute to your poetry, Chief Minister Thackeray's phone call to the injured soldier )महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असलेल्या दुर्गम मुरुमभूशी जंगलात गुरुवारपासून पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू होती. विशेष म्हणजे, हा भाग नक्षलवाद्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या अबुझमाड लगतच आहे. त्या भागात १२ ही महिने मोठ्या संख्येत नक्षल्यांचा जमावडा असतो. त्यांचे प्रशिक्षणस्थळ तसेच शस्त्र, बॉम्ब बनविण्याचे कारखाने आणि ते साठविण्याचेही अड्डे याच भागात आहे. त्या भागात सलग १६ ते १८ तास नक्षल्यांच्या बेछुट गोळीबाराला प्रत्युत्तर देत पोलिसांनी नक्षल्यांचा कारखाना उध्वस्त केला. एवढेच नव्हे तर त्यांना पळून जाण्यासही भाग पाडले.या चकमकीदरम्यान स्वताच्या पायावर गोळी झेलणारा जखमी जवान मोहन उसेंडी यांना शुक्रवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील रात्री इस्पितळात पोहचले. ते डॉक्टरांशी चर्चा करीत असतानाच मध्यरात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा त्यांना फोन आला. पाटील यांच्याकडून जखमी जवानांची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उसेंडी यांच्यासोबत संवाद साधला. ‘महाराष्ट्राची शाैर्याची परंपरा अत्युल्य आहे. तुम्ही बजावलेली कामगिरीदेखील अतुलनीय असून तुमच्या धाडसाचे काैतूक करावे तेवढे थोडेच आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सरकार आणि जनतेच्या वतिने तुमच्या शाैर्याला सॅल्यूट करतो. तुम्ही काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा,’ असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जखमी जवानाचे काैतूक केले.

थँक्यू सर , जय हिंद।काैतूकाच्या या शब्दांनी जखमी जवान उसेंडी यांचे मनोबल कमालीचे उंचावले. जोषाचा बुस्टर मिळाल्यासारखे त्यांनी ‘थँक्यू सर , जय हिंद’ सर म्हणत मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेGadchiroliगडचिरोलीPoliceपोलिस