सलमानचा फैसला ६ मे रोजी

By Admin | Updated: April 22, 2015 04:34 IST2015-04-22T04:34:39+5:302015-04-22T04:34:39+5:30

अभिनेता सलमान खानविरोधातील हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचा निकाल येत्या ६ मे रोजी सत्र न्यायालय जाहीर करणार आहे़

Salman's decision on May 6 | सलमानचा फैसला ६ मे रोजी

सलमानचा फैसला ६ मे रोजी

मुंबई : अभिनेता सलमान खानविरोधातील हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचा निकाल येत्या ६ मे रोजी सत्र न्यायालय जाहीर करणार आहे़
वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले़ त्यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे़ हा गुन्हा सिद्ध झाल्यास सलमानला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते़ सलमानने हा गुन्हा केला आहे, हे सिद्ध करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी २७ साक्षीदार तपासले आहेत़ तर मी गाडी चालवतच नव्हतो, असा दावा सलमानने केला आहे़ सलमानचा चालक अशोक सिंग यानेही मी गाडी चालवत होतो, अशी साक्ष दिली आहे़ त्यामुळे न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Salman's decision on May 6