सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: February 22, 2016 16:02 IST2016-02-22T16:02:42+5:302016-02-22T16:02:42+5:30

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन ही धमकी दिली आहे

Salman Khan threatens to kill | सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 22 - अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन ही धमकी दिली आहे. सलमान खानला मात्र अशाप्रकारचा धमकीचा फोन गेलेला नाही.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन 11 दिवसांपूर्वी आला होता. पोलीस सध्या याप्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र कोणीतरी चेष्टा, मस्करी करण्यासाठी हा फोन केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

Web Title: Salman Khan threatens to kill