शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कापूस बियाणे विक्रीला १ जूनपासून सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 23:00 IST

राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते.

ठळक मुद्देकृषी विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीबाबत विशेष काळजीमागील वर्षी राज्यातील विविध भागात बनावट बियाण्यांची विक्री प्रकरणी ३० गुन्हे दाखलशेंदरी बोंड आळीमुळे २०१७-१८ मध्ये तब्बल १० लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिक बाधित

पुणे: राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाच्या दृष्टीने कापसाच्या बियाण्याचे नियोजन केले असून राज्यातील शेतक-यांसाठी २ कोटी २० लाख कापसाच्या बियाण्यांची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या १५ मे पर्यंत सर्व जिल्ह्यात बियाणे पाठविली जातील. त्यानंतर सर्व अधिकृत कृषी केंद्रांवरून येत्या 1 जूनपासून कापसाच्या बियाण्याच्या विक्रीला सुरूवात केली जाईल,असे राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयातील अधिका-यांनी सांगितले.राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये तब्बल ४२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे कृषी विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीबाबत विशेष काळजी घेतली जात आहे. प्रतिबंधित करण्यात आलेले एसटीबीटी बियाणे बाजारात विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील वर्षी राज्यातील विविध भागात बनावट बियाण्यांची विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाने ३० गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे एसटीबीटी बियाण्याच्या विक्रीला चांगलाच लगाम बसला आहे.कृषी विभागाचे मुख्य निरिक्षक (गुणवत्ता नियंत्रण) चंद्रकांत गोरड म्हणाले,कापसावर पडणा-या शेंदरी बोंड आळीमुळे २०१७-१८ मध्ये तब्बल १० लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिक बाधित झाले होते. त्यामुळे अनेक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु, मागील वर्षी कृषी विभाग आणि बियाणे उत्पादक कंपन्यांनी संयुक्तपणे काम करून शेंदरी बोंड आळीमुळे होणारे कापूस पिकाचे नुकसान आटोक्यात आणले आहे. त्यातच शेतक-यांच्या कापसाला प्रति क्विंटल ६ हजार ३०० रुपये दर मिळाला.त्यामुळे यंदा कापूस पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.गोरड म्हणाले, राज्यात कापूस पिकाचे सुमारे ४२ लाख हेक्टर क्षेत्र असून कृषी विभागातर्फे मागील वर्षी शेतक-यांसाठी २ कोटी २० लाख कापसाच्या बियाण्यांची पाकिटे उपलब्ध करून देण्यात आली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे मागील वर्षी केवळ १ कोटी ६० लाख बियाण्यांच्या पाकिटांची विक्री झाली.केंद्र शासनाने कापसाच्या ४५० ग्रॅमच्या पाकिटाची किंमत सुमारे ७३० रुपये निश्चित केली आहे.

टॅग्स :PuneपुणेcottonकापूसFarmerशेतकरीagricultureशेती