शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शाळेतल्या ‘आई’ला २० वर्षांनी मानधनवाढ; राज्याने वाढविले एक हजार;आता मिळणार २,५०० 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:55 IST

१५०० रुपये एवढ्या अल्प मानधनात स्वयंपाक शिजविणे, मुलांना वाढणे, भांड्यांची स्वच्छता करणे, यासह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे अशी कामे या महिलांना करावी लागतात.

अविनाश साबापुरे  -

यवतमाळ : स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी राज्यातील दीड लाख महिला इतरांच्या मुलांचे शिक्षण तुटू नये म्हणून दररोज झटत आहेत. गोरगरिबांच्या मुलांनी खूप शिकावे, त्यांच्या शाळेत खंड पडू नये म्हणून या ‘आई’ शाळेत दररोज पौष्टिक आहार शिजवून देतात. गेल्या २० वर्षांपासून अवघ्या दीड हजाराच्या मानधनात दिवसभर राबणाऱ्या या ‘आई’ला आता शासनाने एक हजार रुपयांची मानधनवाढ मंजूर केली आहे. मात्र, या अल्पशा वाढीनेही ‘आई’चे हृदय खुश झाले आहे. 

१५०० रुपये एवढ्या अल्प मानधनात स्वयंपाक शिजविणे, मुलांना वाढणे, भांड्यांची स्वच्छता करणे, यासह शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवणे अशी कामे या महिलांना करावी लागतात. त्यातही हे मानधन सहा-सहा महिने विलंबाने मिळते.  या महिलांनी वारंवार आंदोलने केली. त्याची दखल तब्बल २० वर्षांनंतर शासनाने घेतली. आता राज्य शासनाच्या ९०० रुपयांच्या हिश्श्यात हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

त्यामुळे स्वयंपाकी व मदतनीस महिलांना येत्या एप्रिलपासून २,५०० रुपयांचे वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच केंद्राच्या हिश्श्यातही वाढ मिळविण्यासाठी शिक्षण संचालनालयामार्फत प्रयत्न केले जाणार आहे. 

असा झाला योजनेचा प्रवास- शालेय पोषण आहार योजना २२ नोव्हेंबर १९९५ पासून सुरू झाली. त्यावेळी ही योजना केवळ पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच होती. २००८ पासून या योजनेची व्याप्ती वाढवून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आहार दिला जाऊ लागला. - सुरुवातीला पोषण आहार योजना, नंतर मध्यान्ह भोजन योजना आणि आता ‘प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना’ असे या योजनेचे नामकरण झाले आहे.

आहार शिजवूनच का?- १९९५ ते २००१ या काळात किमान ८० टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्याला दरमहा ३ किलो तांदूळ दिला जात होता. - मात्र, या धान्याची अफरातफर होत असल्याचे पाहून ‘पीपल्स युनियन फाॅर सिव्हिल लिबर्टीज’ या संस्थेने केंद्र सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.  - २८ नोव्हेंबर २००१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आहार शिजवूनच वाटप करण्याचा आदेश दिला. २००२ पासून आहार शिजवून वाटप केला जाऊ लागला व त्यासाठी स्वयंपाकी, मदतनीस महिलांची नेमणूकही  केली. 

पोषण आहार योजना -पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी -८५,७६१ शाळा, १ कोटी विद्यार्थ्यांना वाटप, १,५८,८२३ महिला स्वयंपाकी/मदतनीस१५००रु. सध्याचे मानधन९००रु. राज्य सरकारकडून६००रु. केंद्र सरकारकडून

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार