अधिकाच्या वाणासाठी विवाहितेला पेटविले

By Admin | Updated: July 9, 2015 03:01 IST2015-07-09T03:01:55+5:302015-07-09T03:01:55+5:30

अधिक महिन्याचे वाण म्हणून माहेरहून सोन्याची अंगठी आणण्यावरून विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविल्याची संतापजनक घटना दौंड तालुक्यात घडली आहे.

For the sake of authority, the marriage was lit | अधिकाच्या वाणासाठी विवाहितेला पेटविले

अधिकाच्या वाणासाठी विवाहितेला पेटविले

यवत : अधिक महिन्याचे वाण म्हणून माहेरहून सोन्याची अंगठी आणण्यावरून विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविल्याची संतापजनक घटना दौंड तालुक्यात घडली आहे.
गंभीर जखमी झालेल्या या विवाहित महिलेवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ ही घटना रविवारी कवठीचा मळा, वरवंड (ता. दौंड) येथे घडली. पीडित महिला धनश्री रोहन दिवेकर (२५) हिने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ पोलिसांनी धनश्रीचे सासरे रावसाहेब नामदेव दिवेकर, पती रोहन रावसाहेब दिवेकर, सासू अरुणा रावसाहेब दिवेकर यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती रोहन व सासू अरुणा दिवेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. सासरे रावसाहेब दिवेकर फरार झाले आहेत. धनश्रीचा विवाह ३ जून २०१३ रोजी बारामती येथे झाला.
(प्रतिनिधी)

Web Title: For the sake of authority, the marriage was lit