संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ?

By Admin | Updated: August 25, 2014 13:52 IST2014-08-25T13:52:00+5:302014-08-25T13:52:00+5:30

संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे होणा-या ८८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी उमेदावरी जाहीर केली आहे.

Saint Tukaram's descendant, Dr. Sadanand More is the president of the Sahitya Sammelan? | संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ?

संत तुकाराम यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ?

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २५ - संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे होणा-या ८८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संत तुकारामांचे वंशज आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी उमेदावरी जाहीर केली आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होईल असे दिसते. 
संत नामदेव यांची कर्मभूमी घुमानमध्ये पुढील वर्षी ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान ८८ वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्यिक भारत सासणे आणि ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबणीस यांची नावे पूर्वीपासूनच चर्चेत आहे. या स्पर्धेत आता डॉ. सदानंद मोरे यांनीही उडी घेतली आहे. सोमवारी मोरे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा पुण्यात केली. 'जागतिकीकरणाच्या लाटेत मराठी भाषा व संस्कृतीची दुरावस्था झाली आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी संमेलनाचा वापर करता येईल. म्हणूनच मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. 
डॉ. सदानंद मोरे हे संत तुकाराम महाराज यांचे वंशज असून 'द गीता - अ थिअरी ऑफ ह्यूमन एक्शन' या विषयावर त्यांनी पी.एच.डीचे संशोधन केले आहे. सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी त्यांना गुरुदेव दामले हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच 'कृष्ण : द मॅन अँड हिज मिशन' याविषयावर त्यांनी पोस्ट डॉक्टरेट संशोधन केले आङे. पुणे विद्यापीठाच समन्वयक प्राध्यापक म्हणून ते बरीच वर्ष कार्यरत होते. तुकाराम दर्शन या ग्रंथांसाठी त्यांना साहित्य अकादमीसह एकूण १५ पुरस्कार मिळाले आहेत. 
 

Web Title: Saint Tukaram's descendant, Dr. Sadanand More is the president of the Sahitya Sammelan?