मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी काढला. विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला येत्या ३ जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत. दाते यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल, असे गृहविभागाने स्पष्ट केले.
दाते १९९० तुकडीचे आयपीएस अधिकारी असून, केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. केंद्रीय समितीने दोन आठवड्यांपूर्वी मुदतपूर्व कर्तव्यमुक्त केल्याने त्यांच्या महासंचालक पदावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता. २६/११ हल्ल्यात अतिरेक्यांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे दाते यांची कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख आहे.
आतापर्यंतचा कार्यकाळदाते यांनी मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे), राज्य दक्षतवाद विरोधी पथकाचे प्रमुख पदही हाताळले आहे. शहराच्या प्रत्येक पोलिस ठाण्यात स्थापन झालेले दहशतवाद विरोधी कक्ष आणि सोशल मीडिया सेल हे दाते यांच्या कल्पनेतूनच सुरू झाले होते. न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चालू शकते ही कल्पनाही दाते यांनी प्रत्यक्षात आणली.
Web Summary : Sadanand Date, a 1990 batch IPS officer, is Maharashtra's new Director General of Police, succeeding Rashmi Shukla. Date, previously with the NIA, is known for his role in the 26/11 attacks response and his contributions to modernizing police operations, including anti-terrorism cells and video conferencing in court proceedings.
Web Summary : सदानंद दाते महाराष्ट्र के नए पुलिस महानिदेशक बने, रश्मि शुक्ला की जगह लेंगे। 1990 बैच के आईपीएस अधिकारी दाते पहले एनआईए में थे। वे 26/11 के हमलों में अपनी भूमिका और पुलिस संचालन के आधुनिकीकरण के लिए जाने जाते है, जिसमें आतंकवाद विरोधी कक्ष और अदालती कार्यवाही में वीडियो कॉन्फ्रेंसिंग शामिल हैं।