सदाभाऊ खोतांच्या सुनेच्या वाहनाला अपघात, 8 जखमी
By Admin | Updated: February 12, 2017 12:36 IST2017-02-12T12:36:23+5:302017-02-12T12:36:23+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई आणि बागणी जिल्हा परिषद

सदाभाऊ खोतांच्या सुनेच्या वाहनाला अपघात, 8 जखमी
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 12 - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सूनबाई आणि बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार सागर खोत यांच्या पत्नीच्या वाहनाला प्रचारासाठी जात असताना अपघात झाला आहे. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत.
सदाभाऊंच्या सुनबाई इस्लामपूरहून आष्ट्याकडे प्रचारास येत असताना शिंदे मळ्याजवळ (आष्टा) येथे सकाळी सव्वानऊला हा अपघात झाला. बोलेरो उलटल्याने झालेल्या या अपघातात एकूण आठजण जखमी झाले. जखमींना इस्लामपूर येथील राजारामबापू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.